शॉपिंग मॉल, सलूनमध्ये जाताना काय काळजी घ्याल!

saloon
saloon

महाराष्ट्रात ‘अनलॉक १’ची अंमलबजावणी टप्प्याटप्प्याने सुरू झाली आहे. यात शॉपिंग मॉल व केश कर्तनालयांना अद्याप परवानगी देण्यात आलेली नाही. मात्र, सर्वाधिक गर्दी, वस्तूंची मोठी देवाण-घेवाण होणारे व थेट शारीरिक संपर्क येणारी ही केंद्रे सुरू झाल्यानंतर कोरोनाचा धोका वाढण्याची भीती आहे. 

शॉपिंग मॉल्स सुरू होतील तेव्हा...
प्रवेश करताना स्वच्छता (सॅनिटायजर डिस्पेंसर) आणि थर्मल तपासणी ‍करणे अनिवार्य. 
केवळ परिसरामधील लक्षण नसणाऱ्या व्यक्तींना परवानगी देण्यात येईल. 
मास्क लावलेल्यांनाच प्रवेश द्यावा. 
कोरोनाविषयी प्रतिबंधात्मक उपायांवर पोस्टर्स ठळकपणे लावावेत. कोरोनाच्या प्रतिबंधात्मक उपायांवर जागरूकता पसरविण्यासाठी ऑडिओ आणि व्हिडिओ क्लिप नियमितपणे लावावी. ग्राहकांचे गट करावेत. 
मॉलमध्ये सामाजिक अंतर सुनिश्‍चित करण्यासाठी पुरेसे मनुष्यबळ तैनात करावे. 
जास्त जोखीम असलेले उदा. वृद्ध, गर्भवती कर्मचाऱ्यांना फ्रंटलाइन कामावर नेमू नये. मॉल व्यवस्थापनाने ज्या ‍ठिकाणी शक्य आहे तेथे घरातून काम सुलभरीत्या काम करून घ्यावे. 
पार्किंगच्या ठिकाणी आणि परिसराच्या बाहेर सोशल डिस्टंन्सिंगचे मापदंड निश्‍चित करून गर्दीचे व्यवस्थापन करावे. 
व्हॅलेट पार्किंग उपलब्ध असल्यास ऑपरेटिंग स्टाफने मास्क आणि ग्लोव्हज वापरणे अनिवार्य आहे. 
वाहनांचे स्टिअरिंग, दरवाजे, हँडल, चाव्या इत्यादींचे योग्य निर्जंतुकीकरण करावे. 
आवाराबाहेरील आणि परिसरातील कोणतीही दुकाने, स्टॉल्स, कॅफेटेरिया इत्यादी प्रत्येक वेळी सोशल डिस्टंन्सिंगच्या नियमांचे पालन करावे. 
आवारात रांगेचे व्यवस्थापन करण्यासाठी पुरेशा अंतरासह विशिष्ट चिन्हे/खुणा कराव्यात, जेणेकरून सोशल डिस्टंन्सिंगचे पालन होईल. 
प्राधान्याने अभ्यागत, कामगार व माल पुरवठादार यांच्यासाठी प्रवेश व बाहेर पडण्याची स्वतंत्र व्यवस्था करावी. 
होम डिलिव्हरीसाठी असलेल्या कर्मचाऱ्‍यांची घरपोच वितरण करण्यापूर्वी शॉपिंग मॉलद्वारे थर्मल तपासणी करावी. 
खरेदीमध्ये पुरवठा, यादी आणि वस्तू हाताळताना आवश्यक ती खबरदारी घ्यावी. योग्य रांग व्यवस्थापन आणि निर्जंतुकीकरण करावे. 
प्रवेशासाठी रांगा लावताना कमीतकमी ६ फूट शारीरिक अंतर राखणे आणि शॉपिंग मॉलमध्ये शक्य तिथे सामाजिक अंतर राखणे आवश्यक आहे. 
मॉलमध्ये ग्राहकांची संख्या कमीत कमी ठेवावी. 
बसण्याची व्यवस्थेतही सामाजिक अंतर राखावे. लिफ्टमधील लोकांची संख्या मर्यादित ठेवावी. 
ग्राहकांना एस्केलेटरच्या वापरास प्रोत्साहित करावे. 
वातानुकूलन/व्हेंटिलेशनसाठी ‘सीपीडब्ल्यूडी’च्या मार्गदर्शक सूचनांचे पालन करावे. सर्व वातानुकूलन उपकरणांचे तापमान सेटिंग २४-३० अंशाच्या तर सापेक्ष आर्द्रता ४०-७० अंशाच्या श्रेणीत असावी. मोकळी हवा राहील, याची खबरदारी घ्यावी. 
परिसरातील स्वच्छतेवर विशेष लक्ष केंद्रित करावे. विशेषतः स्वच्छतागृह, हात आणि पाय धुण्याची जागा. 
वारंवार स्पर्श होणाऱ्या पृष्ठभागाची (डोअर नॉब्ज, लिफ्टची बटणे, हँड रेल, बेंच, वॉशरूम, लिफ्ट, एस्केलेटर इ.) १ टक्का सोडियम हायपोक्लोराइटने सतत स्वच्छता करावी. 
 ग्राहक, कर्मचाऱ्यांनी वापरलेल्या मास्क, ग्लोव्हजची योग्य विल्हेवाट लावावी. 
गेमिंग आर्केड्स, मॉल्समधील सिनेमा हॉल बंद राहतील. 

फूड-कोर्टमधील खबरदारी
अ.    सामाजिक अंतरासाठी गर्दीचे आणि रांग व्यवस्थापन करावे. 
ब.    फूड कोर्ट आणि रेस्टॉरंट्समध्ये बसण्याच्या क्षमतेच्या ५० टक्क्यांपेक्षा अधिक परवानगी नाही. 
क.    फूड कोर्टाचे कर्मचारी, वेटर यांनी मास्क व हँड ग्लोव्हज घालणे अनिवार्य आहे. 
ड.    ऑर्डरचा कॉन्टॅक्टलेस मोड आणि डिजिटल पेमेंटचा मोड (ई-वॉलेट्स वापरून) वापरावे.
ई.    ग्राहक निघून गेल्यानंतर टेबल निर्जंतुकीकरण करावे. स्वयंपाकघरात सामाजिक अंतर आणि स्वच्छता ठेवावी. 

केश कर्तनालयात घ्यावयाची काळजी 
केश कर्तनालयामध्ये खुर्च्यांमध्ये एक मीटरचे अंतर असावे. सामाजिक अंतराचे पालन करावे. 
    कामगाराने केश कर्तनापूर्वी व नंतर किमान ४० सेकंद साबणाने हात धुणे व निर्जंतुकीकरण करणे आवश्‍यक आहे. 
    केश कर्तनालयामध्ये काम करणाऱ्यांनी व ग्राहकांनी मास्क वापरावा. 
    प्रत्येक वेळी नवीन नॅपकीन वापरावा. नंतर सोडिअम हायपोक्‍लोराईट १ टक्‍क्‍यांमध्ये किमान ३० मिनिटे भिजवून पूर्णतः वाळवावा. 
    केश कर्तनासाठी किंवा दाढी करताना वापरण्यात येणारे सर्व साहित्य उदा ः कात्री, वस्तारा आदी प्रत्येक वापरापूर्वी सोडिअम हायपोक्‍लोराईट १ टक्‍क्‍यांत निर्जंतुकीकरण करावे. 
 ग्राहक बसण्यापूर्वी खुर्चीचे निर्जंतुकीकरण करावे.
 केश कर्तनालयाच्या बाहेर किंवा आत गर्दी न होण्यासाठी वेळ निश्‍चित करून पूर्व नियोजित वेळेनुसार बोलविण्यात यावे. 
 चेहरा व डोक्‍याचा मसाज करण्यासाठी डिस्पोजेबल ग्लोव्हजचा वापर करावा. 
 पैशाची देवाण-घेवाण करण्यासाठी ऑनलाइन माध्यमांचा वापर करावा. 
केश कर्तनालयाचे दर चार तासाने सोडिअम हायपोक्‍लोराईटद्वारे निर्जंतुकीकरण करावे.

पुण्याच्या बातम्या वाचण्यासाठी येथे  क्लिक करा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com