व्हिडिओ कॉन्फरन्सिंगद्वारे घेतला घटस्फोट

सकाळ वृत्तसेवा
शनिवार, 18 ऑगस्ट 2018

पुणे - भारतात विवाह झालेल्या मात्र, परदेशात स्थायिक झालेल्या एका जोडप्याने नुकताच व्हिडिओ कॉन्फरन्सिंगद्वारे घटस्फोट घेतला.

नोकरीनिमित्त पती अमेरिकेत आणि पत्नी जर्मनीत असल्याने कौटुंबिक न्यायालयातील व्हिडिओ कॉन्फरन्सिंगच्या माध्यमातून हा खटला निकाली काढण्यात आला. न्यायाधीश सुभाष काफरे यांनी हा निकाल दिला.

या जोडप्याचा जुलै २०१६ मध्ये पुण्यात विवाह झाला होता; मात्र दोघांमध्ये वाद होऊ लागल्याने त्यांनी वेगळे होण्याचा निर्णय घेतला. नोकरीनिमित्त दोघांनाही परदेशी जावे लागणार होते. त्यामुळे याबाबतीत खटल्यासाठी दोघांनी त्यांच्या नातेवाइकांना पॉवर ऑफ ॲटर्नी दिली. यानंतर दोघे परदेशात गेले. या खटल्यात ॲड. प्रगती पाटील यांनी मीडीएटर म्हणून काम पाहताना, दोघांच्या वडिलांशी संवाद साधला. व्हिडिओ कॉन्फरन्सिंगद्वारे दोघांच्या साक्षी नोंदवण्यात आल्यानंतर न्यायालयाने या दोघांचा परस्पर संमतीने घटस्फोटाचा दावा निकाली काढला. खटल्यासाठी कोर्ट कमिशनर म्हणून झकीर मणियार यांनी काम पाहिले.

अनेक जोडप्यांना त्यांच्यातील तीव्र मतभेदांमुळे घटस्फोट घ्यायचा असतो. तरुण जोडप्यांमध्ये एखाद्याला किंवा दोघांनाही परदेशात करिअरसाठी चांगली संधी आली किंवा नोकरीसाठी परदेशात जावेच लागले तर करिअरला प्राधान्य की घटस्फोट होईपर्यंत थांबायचे, अशी द्विधा निर्माण होते; मात्र व्हिडिओ कॉन्फरन्सिंगच्या सुविधेमुळे पक्षकाराचे नोकरी, करिअरचे नुकसानही होत नाही आणि वेळ व पैशाचीही बचत होते.
- ॲड. वैशाली चांदणे, अध्यक्ष, फॅमिली कोर्ट लॉयर्स असोसिएशन

Web Title: Divorce taken through video conferencing