भेट होतेय, पण मनमोकळेपणे बोलणं नाही!

Divorce_Parents
Divorce_Parents

पुणे : मुलांच्या आयुष्यात काय सुरू आहे, त्यांच्या सुख-दुःखाची माहिती ताबा नसलेल्या पालकांना मिळावी म्हणून दोघांची न्यायालयाने सांगितलेल्या वेळेत भेट होत असते. मात्र, मुलांचा ताबा असलेले पालकही भेटीवेळी उपस्थित असतात. त्यामुळे पालकाचा मुलांवर दबाव असेल, तर ते मनमोकळेपणे बोलतच नसल्याचे प्रकार घडत आहेत.

पालकांचा घटस्फोट झाला असेल किंवा तो होण्याच्या प्रक्रियेत असेल, तर मुलांचा ताबा नसलेल्या पालकांना न्यायालयाच्या आदेशानुसार मुलांना भेटता येते. मुलांना दोन्ही पालकांचा सहवास मिळावा हा त्यामागील उद्देश. मात्र मुलांचाच हत्यार म्हणून वापर करीत ताबा नसलेल्या पालकावर सूड उगविण्यात येत असल्याचे प्रकार काही दाव्यांत घडले आहे. मुलं जर ताबा असलेल्या पालकाला घाबरत असतील किंवा त्यांच्या मनात दुसऱ्या पालकाविषयी विष कालवून दिले असेल, तर मुलं भेटीच्या वेळी दुसऱ्या पालकाची बोलतच नाहीत. भेटीवेळी बऱ्याचदा ताबा असलेला पालक त्याच ठिकाणी बसलेला असतो. तसेच भेटीत काय बोलायचे, काय नाही हे आधीच त्यांना सांगून ठेवले जाते. त्यामुळे भेटीदरम्यान काही मुलं व्यक्‍तच होत नाहीत.

बोलणं केले जात रेकॉर्ड :
मुलं सांगितल्याप्रमाणे बोलत आहेत की नाहीत, साथीदार आपल्याविषयी मुलाला काय सांगतो किंवा त्याच सध्या काय सुरू आहे, यावर लक्ष ठेवण्यासाठी भेटी दरम्यानचे बोलणे मोबाइलमध्ये रेकॉर्ड केले जाते. भेटीसाठी जात असलेल्या मुलाबरोबर मोबाईल पाठवून त्यांचे बोलणे रेकॉर्ड केल्याच्या घटनाही घडल्या आहेत. मोबाईलजवळ असेल, तर मुलांच्या मनात आणखीच भीती निर्माण होते. त्यामुळे तो बोलणे टाळतो किंवा ही बाब पालकाच्या निदर्शनास आणून देतो.

मुलं आणि पालकांचा संवाद वाढणे गरजेचे आहे. त्याची जाणीव दोन्ही पालकांनी ठेवली पाहिजे. मुलं जास्त वेळ ज्या पालकांकडे असतात, त्यांचा त्यांच्यावर प्रभाव असतो. त्यामुळे तोच पालक बरोबर आहे, असे त्यांना वाटते. अल्पवयीन मुलं असतील, तर त्यांच्या बाबतीत बऱ्याचदा असे होते. नेमके कोणाचे ऐकायचे यावरून त्यांचा गोंधळ देखील होतो. आई-वडिलांत खूपच वाद असतील, तर मुळात भेट टाळली जाते. तर भेट होणार असेल तर त्यात काय बोलायचे हे मुलांना सांगितले जाते.
- ऍड. शैलेश ब्रम्हे, फौजदारी व कौटुंबिक न्यायालयातील वकील

- पुण्याच्या बातम्या वाचण्यासाठी येथे ► क्लिक करा

(Edited by : Ashish N. Kadam)

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com