सहा महिन्यांचा कालावधी वगळून ‘त्यांना’ घटस्फोट

सकाळ वृत्तसेवा
मंगळवार, 16 एप्रिल 2019

पती-पत्नी पुन्हा नांदू शकणार नाहीत, असा निष्कर्ष काढत परस्पर संमतीने घटस्फोटासाठी दाखल केलेला दावा सहा महिन्यांचा कालावधी वगळून कौटुंबिक न्यायालयाने मंजूर केला. अपवादात्मक परिस्थितीमध्ये असा निकाल देण्यात येतो.

पुणे - पती-पत्नी पुन्हा नांदू शकणार नाहीत, असा निष्कर्ष काढत परस्पर संमतीने घटस्फोटासाठी दाखल केलेला दावा सहा महिन्यांचा कालावधी वगळून कौटुंबिक न्यायालयाने मंजूर केला. अपवादात्मक परिस्थितीमध्ये असा निकाल देण्यात येतो. 

घटस्फोटाचा अर्ज केल्यानंतर दोघांमधील वाद मिटावा म्हणून किमान सहा महिने दावा प्रलंबित ठेवण्यात येतो. पण, या प्रकरणात तो कालावधी वगळला. अरुणा आणि केशव (नावे बदललेली) या दाम्पत्याने हा दावा दाखल केला होता. त्यांचा मार्च २००७ मध्ये विवाह झाला होता. त्यानंतर दोघांचे पटेनासे झाल्याने २०१२ मध्ये त्यांनी घटस्फोटासाठी दावा दाखल केला. मात्र, केशवने पोटगी दिली नाही. त्यामुळे २०१५ मध्ये तो दावा न्यायालयाने रद्द केला. त्यानंतर दोघांनी परस्पर संमतीने घटस्फोटासाठी दहा ते बारा दिवसांपूर्वी दावा दाखल केला. त्यात पोटगीबाबत दोघांत तडजोड झाली आहे. त्यामुळे न्यायालयाने सहा महिन्यांचा कालावधी वगळून त्वरित दावा निकाली काढला. केशवकडून ॲड. रवींद्र पाटोळे यांनी, तर अरुणाकडून ॲड. विजया मनोहर अकोलकर यांनी काम पाहिले.

Web Title: Divorse Court Result