असंख्य पणत्यांनी उजळला शिवनेरी

सकाळ वृत्तसेवा
मंगळवार, 29 ऑक्टोबर 2019

जुन्नर (पुणे) : शिवनेरी किल्ल्यावर सोमवारी (ता. 28) दिवाळी पाडवा पहाटेचे औचित्य साधत येथील युवकांनी दीपोत्सव साजरा केला. या वेळी लावलेल्या असंख्य पणत्यांनी शिवनेरी गड उजळून गेला होता. या वेळी युवकांनी शिवरायांना मानवंदना दिली. परिसरात स्वच्छता मोहीमदेखील राबविली.

छत्रपती शिवाजी महाराजांचे जन्मस्थान, शिवकुंज, शिवाईदेवी मंदिर, पायरी मार्गावर पोवाडे गात मंदार बुट्टेपाटील युवा मंचच्या वतीने पणत्या व आकाशकंदील लावण्यात आले. सकाळी शिवाईदेवीची पूजा व आरती करण्यात आली. युवा मंचच्या कार्यकर्त्यांनी गड उतरताना तसेच तीनही उद्यानांतील केरकचरा उचलून स्वच्छता केली. किल्ल्याच्या पायथ्याशी असलेल्या पंचलिंग मंदिराजवळील शिवसृष्टीत पणत्या लावण्यात आल्या. रांगोळी काढून हुतात्मा जवानांना आदरांजली वाहिली. ही संकल्पना मंदार बुट्टेपाटील यांनी प्रतीक शेळके, सिद्धेश ढोले, शुभम गोसावी, विशाल पवार, विक्रम पवार, पार्थ भोर, अजित बोचरे, हृषीकेश रेंगडे, साहिल आल्हाट, सुनील केदारी, अनिल केदारी, शंकर फल्ले यांच्या सहकार्याने राबविली.

स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Diwali Celebration On Shivneri Fort