Diwali Festival 2020 : शेतक-यांना कोरोनाने मारले तर आता दसरा-दिवाळी सणाने तारले

Marigold growers are getting Rs 100 per kg during Diwali.jpg
Marigold growers are getting Rs 100 per kg during Diwali.jpg

निरगुडसर (पुणे) : दोन महिन्यांपूर्वी कवडीमोल बाजारभावाअभावी फुले फेकून देण्याची वेळ शेतक-यांवर आल्याने शेतक-यांना मोठा फटका बसला. त्यानंतर आलेल्या दसरा सणाने झेंडू फुल उत्पादक शेतक-यांना तारले व आता दिवाळी सणात मिळत असलेला १०० ते १२० रुपये प्रतिकिलो बाजारामुळे शेतक-यांची दिवाळी गोड केली आहे, त्यामुळे मागे कोरोनाने मारले तर आता दसरा-दिवाळी सणाने तारले आहे. 

हे ही वाचा : Diwali Festival 2020 : पाच शतकांचा साक्षी असलेल्या कोटाच्या पायऱ्यांवर दीपोत्सव; पांढरीच्या कोटाचा इतिहास पुन्हा उजाळला
 
गणेशोत्सव झाल्यानंतर झेंडूचे भाव कोसळल्याने शेतकऱ्यांना झेंडू फेकून देण्याची वेळ आली होती. केलेला उत्पादन खर्चही वसूल होत नव्हता. शेतकरीवर्ग आर्थिक संकटात सापडलेला होता. शेतक-यांनी मशागत, मल्चिंग, ठिबक, रोपे, खते, औषधे, मजुरी आदींसाठी एकरी ८० ते १ लाख रुपयांपर्यंत खर्च केला होता. परंतु फुले बाजारभावाअभावी फेकून देण्याची वेळ आली आहे.

आंबेगाव तालुक्यातील नागपूर व रांजणी येथील १० तरुण शेतक-यांनी झेंडूचे पीक घेतले. परंतु बाजारभाव मिळत नसल्याने त्यांना फुले पदरमोड मजुरी घालून फुले तोडून आपल्याच शेतात फेकून दयावी लागली. त्यामुळे या १० शेतक-यांना जवळपास ८ ते १० लाख रुपयांचा फटका दोन महिन्यांपूर्वी बसला होता. त्यातील काही शेतक-यांनी फुलशेतीवर नांगर फिरवला काहींनी तग धरुन राहीले आणि आलेल्या दसरा सणाला १०० ते १४० रुपये प्रतिकिलो दर पुणे मार्केटमध्ये मिळाल्याने शेतक-याला आधार मिळाला होता. 

हे ही वाचा : पोस्टाकडून घरपोच जीवनपोच जीवन प्रमाणपत्र 
 
कोरोनाच्या काळात शेतकऱ्यांना झेंडू पीक शेतातून उपटण्याची वेळ आली, काहींना झेंडू फेकून देण्याची वेळ आली. मंदिरे बंद असल्याने झेंडूला बाजार भाव मिळत नव्हता. त्यानंतर श्रावण महिन्यात आणि गणेशोत्सव काळात फुलांना १५० रुपयांच्या पुढे दर मिळाल्याने शेतक-यांचे पैसे झाले खरे, परंतु त्यानंतर बाजारभाव कोसळले आणि जवळपास २५ दिवस शेतक-यांना फुले फेकून देण्याची वेळ आली. दसरा सणाला प्रतिकिलो १०० ते १२० रुपये बाजारभाव मिळाला आणि शेतक-यांना चांगले पैसे मिळाले, त्यानंतर बाजारभाव पुन्हा कमी झाले आणि पुढे दिवाळी सणाला १५ दिवस अवकाश होता. पण दिवाळीच्या १० तारखेपासून १०० रुपये प्रति किलो दर मिळत असल्याने शेतकऱ्यांचा दिवाळी सणातील गोडवा वाढला आहे.
 
निरगुडसर (ता.आंबेगाव) येथील युवा शेतकरी विजय टाव्हरे म्हणाले की, दस-याला पाच टन मालाला ८० ते १०० रुपये प्रतिकिलो दर मिळाला, तर दिवाळीच्या १० तारखेपासून एक टन मालाची विक्री ९० ते १०० रुपये प्रतिकिलो दराने झाली आहे आणि उदया दिड टन विक्रीसाठी मुंबईला पाठवणार आहे. पुढील काही दिवसात अजून आठ टन मालाचे उत्पादन मिळणार आहे. पण दसरा व दिवाळीमध्ये मिळालेल्या चांगल्या दरामुळे शेतक-याला ख-या अर्थाने तारले.
  
रांजणी (ता.आंबेगाव) येथील युवा शेतकरी तुषार वाघ म्हणाले, मी एक एकर क्षेञावर झेंडूचे पिक घेतले असून मागील काळात झेंडू फेकून देण्याची वेळ आली. परंतु दस-याला १०० ते १२० रुपये प्रतिकिलो दर मिळाला तर आता दिवाळी सणाला १०० रुपये दर मिळत आहे, त्यामुळे दसरा दिवाळी सणाने तारले हे नक्की


संपादन - सुस्मिता वडतिले 

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com