झुंबर, दिवे अन् नक्षीदार पणत्या

कुंभार वेस, कसबा पेठ - लक्ष्मीपूजनासाठी लागणारी रंगीबेरंगी बोळकी बाजारात विक्रीसाठी आली आहेत.
कुंभार वेस, कसबा पेठ - लक्ष्मीपूजनासाठी लागणारी रंगीबेरंगी बोळकी बाजारात विक्रीसाठी आली आहेत.

पुणे - दिवाळीनिमित्त सजावटीच्या साहित्याने शहरातील बाजारपेठा गजबजून गेल्या आहेत. या वर्षी बाजारपेठांत दिवाळी साहित्याचा ‘नवा ट्रेंड’ दिसून येत आहे. विविध प्रकारातील दिवे, आकाश कंदील, आकर्षक झुंबर, नक्षीदार पणत्या, रंगीबेरंगी बोळकी नागरिकांचे आकर्षण ठरत आहेत. 

कुंभारवाड्यासह मध्यवर्ती भागातील बाजारपेठांमध्ये नागरिकांची खरेदीसाठी गर्दी होत आहे. सजावटीचे, पूजेचे साहित्य नागरिक खरेदी करत आहेत. खास मुलांसाठी तयार किल्ले, शिवाजी महाराज, मावळे, शेतकरी, प्राणी यांच्या 
मूर्ती बाजारात विक्रीसाठी आल्या आहेत. १०० रुपये ते १५० रुपयांपर्यंतच्या त्या उपलब्ध आहेत. लक्ष्मीपूजनाचे विविध प्रकारचे साहित्यही उपलब्ध आहे. 

विक्रेते राहुल साळवे म्हणाले, ‘साहित्याच्या दरामध्ये गेल्या वर्षीच्या तुलनेत काही विशेष फरक नाही. त्यामुळे नवीन साहित्य खरेदीला नागरिक पसंती देत आहेत. महिला, तरुणींचा खरेदीसाठी उत्साह वाढत आहे.’

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com