यावर्षी पुण्यातील बागेत ‘दिवाळी पहाट’ नाहीच; महापौर मुरलीधर मोहोळ

सकाळ वृत्तसेवा
Thursday, 29 October 2020

पुण्यातील सर्व उद्याने येत्या एक नोव्हेंबरपासून नागरिकांसाठी खुली होणार असल्याचे महापौर मुरलीधर मोहोळ यांनी सांगितले असले, तरी एकाच वेळी उद्याने सुरू करण्याऐवजी ती टप्प्याटप्प्याने उघडण्यात येणार आहेत. मात्र, उद्यानांत ‘दिवाळी पहाट’सारख्या कार्यक्रमांना परवानगी नसेल, असे महापालिका प्रशासनाने स्पष्ट केले आहे.

पुणे - पुण्यातील सर्व उद्याने येत्या एक नोव्हेंबरपासून नागरिकांसाठी खुली होणार असल्याचे महापौर मुरलीधर मोहोळ यांनी सांगितले असले, तरी एकाच वेळी उद्याने सुरू करण्याऐवजी ती टप्प्याटप्प्याने उघडण्यात येणार आहेत. मात्र, उद्यानांत ‘दिवाळी पहाट’सारख्या कार्यक्रमांना परवानगी नसेल, असे महापालिका प्रशासनाने स्पष्ट केले आहे. 

ताज्या बातम्यांसाठी डाऊनलोड करा ई-सकाळचे ऍप

- पुण्याच्या बातम्या वाचण्यासाठी येथे ► क्लिक करा

उद्यानांत नागरिकांना पहिल्या दिवसापासून सर्व सुविधा पुरविण्यासाठी साफसफाईपासून दुरुस्तीचीही कामे करण्यात येत आहेत. मात्र, उद्याने उघडण्याबाबतचा महापालिका आयुक्त विक्रम कुमार यांचा आदेश आल्यानंतर प्रत्यक्ष कार्यवाही होईल, असे उद्यान खात्याकडून सांगण्यात आले.

महत्त्वाची बातमी: प्रवाशांनो, दिवाळीसाठी पुण्यातून सुटणार १६० जादा गाड्या

कोरोनाचा संसर्ग रोखण्याचा उपाय म्हणून गेल्या सात महिन्यांपासून उद्याने बंद आहेत. महापालिका आयुक्त कुमार आणि उद्यान खात्याचे प्रमुख अशोक घोरपडे यांच्याशी चर्चा केल्यानंतर खबरदारीचे उपाय योजून उद्याने सुरू करण्यात येणार असल्याची घोषणा महापौर मोहोळ यांनी केली. त्यानुसार सर्व म्हणजे १९० उद्यानांत पूर्वतयारी करण्यात येत आहे. परंतु, दिवाळीच्या तोंडावर उद्याने उघडली जाणार असल्याने कार्यक्रम घेतले जाऊ शकतात. या पार्श्‍वभूमीवर महापालिकेने आतापासून काळजी घेण्यास सुरुवात केली आहे. तीन टप्प्यांत उद्याने खुली करण्यासोबतच गर्दीची शक्‍यता असलेल्या कार्यक्रमांना परवानगी न देण्यावर प्रशासन ठाम राहणार आहे. 

अखेर पुणे विद्यापीठाचं ठरलं; बॅकलॉगची परीक्षाही होणार ऑनलाइन!

पावसामुळे दुरवस्था
उद्यानांची नियमित साफसफाई केली जाते. मात्र, गेल्या काही दिवसांत झालेल्या पावसाने उद्यानांतही पाणी होते. त्यामुळे काही झाडे आणि लॉनची दुरवस्था झाली आहे. त्याशिवाय मुलांसाठीची खेळणीही खराब झाली आहेत. त्याची दुरुस्ती करण्यासह उद्यानांतील मत्स्यालयांची नव्याने स्वच्छता करण्यात येत आहे.

शहरातील उद्याने उघडण्याच्या दृष्टीने कामे करण्यात येत आहेत. नागरिकांच्या सुरक्षिततेला प्राधान्य असल्याने बंधने निश्‍चितच असतील. 
- अशोक घोरपडे, उद्यान विभागप्रमुख, महापालिका

Edited By - Prashant Patil


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Diwali pahat Programme Cancel in pune Murlidhar Mohol