‘शुभ दिन आज आनंद मन गाओ’

नीला शर्मा 
शनिवार, 26 ऑक्टोबर 2019

पुणे - यंदाच्या दिवाळीवरील पावसाचे सावट व वातावरणात अजूनही भरून राहिलेला निवडणुकीचा कोलाहल विसरायला लावण्यासाठी कलावंत पुढे सरसावले आहेत. ‘सकाळ’च्या वाचकांसाठी पंडित रघुनंदन पणशीकर, पंडित शौनक अभिषेकी, डॉ. विकास कशाळकर व युवा गायिका अनुराधा कुबेर या सर्वांनी संगीतमय शुभेच्छा व्हिडिओच्या माध्यमातून दिल्या आहेत. 

 ‘धन धन धन मंगल गाओ रे, शुभ दिन आज आनंद मन गाओ,’ या बंदिशीतून गायिका अनुराधा शुभेच्छा देत असताना व्हिडिओत डॉ. चैतन्य कुंटे (हार्मोनियम) व विभव खांडोळकर (तबला) साथ करताना दिसतात. प्रसन्नता निर्माण करणारी ही रचना ‘सकाळ फेसबुक’वरील व्हिडिओतून वारंवार ऐकावीशी वाटेल.  पणशीकर यांनी रागेश्री रागातील ‘दीप दीप करे जगमग आज, हर घर घर’ या बंदिशीतून आनंदाची पखरण केली आहे. 

डॉ. कशाळकर यांनी गावती रागातील स्वरचित बंदिश ‘आई दिवाली, लेवो बधावा, आनंद छाये तुम्हरे घरवा’ ही बहारदारपणे सादर केली आहे. डॉ. कशाळकर म्हणाले, ‘‘राष्ट्रीय पातळीवर डळमळीत आर्थिक स्थिती; या पार्श्वभूमीवर तरुण मंडळी आव्हाने स्वीकारत आहेत. त्यांच्या मनातील आशावाद व उत्साह या दिवाळीचा आनंद द्विगुणित करणारा मला वाटतो.’’

स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: diwali program in pune

टॅग्स
टॉपिकस
Topic Tags: