Diwali Railway Tickets : दिवाळीच्या रेल्वे तिकिटांना आतापासूनच प्रतीक्षा ; आरक्षण सुरू होताच पाच मिनिटांत ‘रिग्रेट’; लांब पल्ल्याच्या गाड्यांना मागणी

Pune Passengers Face Waiting List and Regret Status : दिवाळीच्या सुट्टीसाठी पुण्याहून गावी जाणाऱ्या प्रवाशांना रेल्वे आरक्षण सुरू होताच तिकिटांच्या तुटवड्याचा सामना करावा लागत आहे.
Diwali Railway Tickets

Diwali Railway Tickets

esakal

Updated on

पुणे : ‘नोव्हेंबरमध्ये असलेल्या दिवाळीला घरी जाण्यासाठी रेल्वेचे आरक्षण परवा सुरू झाले. सकाळी आठ वाजता आरक्षण सुरू होताच संकेतस्थळावर गाडी आणि प्रवासाची तारीख निवडली; मात्र पैसे भरेपर्यंत जागा उपलब्ध नसल्याचे दिसले. ‘वेटिंग’ तिकीट मिळेल, या अपेक्षेने पुन्हा प्रयत्न केला; मात्र काही गाड्यांमध्ये तेही उपलब्ध नसल्याने ‘रिग्रेट’ आले.’

दिवाळीसाठी गावी जाण्याचे नियोजन करणाऱ्या एका प्रवाशाचा हा अनुभव. दसरा-दिवाळीनिमित्त पुण्यातून कोकण, मराठवाडा, विदर्भ, तसेच उत्तर भारतातील विविध शहरांकडे जाणाऱ्या लाखो प्रवाशांना हाच अनुभव आला. आरक्षण सुरू झाल्यानंतर सुरुवातीच्या काही मिनिटांतच अनेक रेल्वेगाड्यांची तिकिटे आरक्षित झाली.

Diwali Railway Tickets
Pune News : पाझर तलावांचा साठा घटला; पाणी उपशावर निर्बंध, झेडपीच्या जलव्यवस्थापन समितीकडून अधिकाऱ्यांना निर्देश

त्यामुळे सकाळी आरक्षण सुरू झाल्यानंतर काही वेळाने संकेतस्थळ किंवा ॲपवर आलेल्या प्रवाशांच्या हाती ‘वेटिंग’शिवाय पर्याय राहिला नाही. ऑनलाइन घोळ टाळण्यासाठी प्रत्यक्ष तिकीट खिडकीवर जाणाऱ्या प्रवाशांनाही रिकाम्या हाती परतावे लागले.

पुण्याहून विदर्भाच्या दिशेने जाणाऱ्या अजनी-पुणे एक्स्प्रेस, महाराष्ट्र एक्स्प्रेस, गरीब रथ, हमसफर एक्स्प्रेस, नागपूर-पुणे एक्स्प्रेस यांसारख्या गाड्यांना सणासुदीच्या काळात मोठी मागणी असते. कोलकात्याकडे जाणाऱ्या आझाद हिंद एक्स्प्रेसला, तसेच पुणे-काझीपेठ एक्स्प्रेसलाही प्रवाशांची पसंती असते. याशिवाय दिल्ली, लखनौ, पटना, दाणापूर या मार्गांवरील झेलम एक्स्प्रेस, लखनौ एक्स्प्रेस, दाणापूर एक्स्प्रेस आदी रेल्वेंनाही भरपूर गर्दी होते. या सर्वच मार्गांवरील प्रवाशांसमोर आता तिकिटाचे आव्हान उभे राहिले आहे. त्यांना आता विशेष रेल्वे गाड्यांची प्रतीक्षा करावी लागेल.

रेल्वेने यापूर्वी १२० दिवस आधी आरक्षणाची सुविधा दिली होती. त्यानंतर आरक्षणाचा कालावधी कमी करून ६० दिवस करण्यात आला. मात्र, आरक्षणासाठी उपलब्ध कालावधी कमी झाला असला, तरी सणासुदीच्या काळातील मागणीत फारसा फरक पडला नाही. लांब पल्ल्याचा प्रवास तुलनेने सुरक्षित, सोईस्कर आणि किफायतशीर असल्याने रेल्वेला प्रवाशांची पसंती कायम आहे. त्यामुळे वाढती मागणी लक्षात घेता दसरा-दिवाळीच्या काळात विशेष गाड्यांची संख्या वाढविण्याची प्रवाशांची मागणी आहे.

Diwali Railway Tickets
Maharashtra Rain Alert : राज्यात परतीच्या पावसाचा जोर वाढणार; विदर्भ-मराठवाड्यासह २९ जिल्ह्यांना येलो अलर्ट

"दिवाळीच्या सुट्टीत गावी जाण्यासाठी तिकीट मिळावे, यासाठी दोन महिने आधीच आरक्षणाची तयारी केली होती. आरक्षण सुरू होण्याच्या तारखेवर लक्ष ठेवून सकाळी आठ वाजता तिकीट आरक्षित करण्याचा प्रयत्न केला; पण काही मिनिटांतच जागा संपल्या. पुन्हा प्रयत्न करेपर्यंत ‘वेटिंग’ तिकिटेदेखील संपली होती. "

- निकिता देशमाने, नोकरदार

तिकीट दलालांमुळे फटका

रेल्वेच्या या तिकिटांत दलालांच्या घुसखोरीचा मोठा फटका सामान्य प्रवाशांना बसतो. आरक्षण केंद्रामध्येही काही वेळा हे दलाल निरीक्षकांची नजर चुकवून तिकिटांची खरेदी करतात, तसेच ऑनलाइन तिकिटांसाठी दलालांना अधिकृत परवानगी आणि स्वतंत्र लॉगिन दिले असले, तरी गतिमान पद्धतीने तिकिटे आरक्षित करण्यासाठी विशिष्ट अत्याधुनिक तंत्रज्ञानाचा वापर या दलालांकडून केला जातो. दलालांच्या या घुसखोरीला तातडीने आळा घालण्याची मागणी प्रवाशांनी केली.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Loading content, please wait...

Related Stories

Nanded Panvel Express
Pune-Beed New Railway Service to Begin Regular
Nandigram Express
Konkan Railway Latest News
Marathi News Esakal
www.esakal.com