दिवाळीच्या खरेदीचं आतापासूनच नियोजन; यंदा 'अशा' पद्धतीने होणार खरेदी

online-sh.jpg
online-sh.jpg

पुणे : दरवर्षी मी दिवाळीत घरासाठी एक तरी इलेक्‍ट्रॉनिक वस्तू नक्कीच घेतो. त्यावेळेत दुकानांत चांगली सवलत देणारे सेल असतात. त्यामुळे परवडेल अशी खरेदी होऊन जाते. यंदा मात्र कोरोनाच्या प्रादुर्भावामुळे दुकानात जाऊन खरेदी करणे सुरक्षित आणि परवडणारे नसणार. त्यात सध्या ऑनलाईन खरेदीसाठी चांगल्या सवलती देण्यात येत आहे. त्यामुळे माझी दिवाळी खरेदी तर मी ऑनलाईनच करणार, असल्याचे वैशाख नामबीयर या तरुणाने सांगितले. 

वैशाख हा खासगी कंपनीमध्ये काम करतो व त्याच्या कुटुंबात आई, बाबा आणि लहान भाऊ आहेत. दरवर्षी तो दिवाळीमध्ये दुकानातून नवनवीन वस्तू खरेदी करत असतो. पण यंदा मात्र त्याने ऑनलाईन पर्याय निवडला आहे. दिवाळीच्या खरेदीची बदलती मानसिकता अभ्यासणारा 'टीआरए रिसर्च' चा 'दिवाळी 2020 बाइंग प्रायॉरिटी रिपोर्ट' नुकताच प्रकाशित करण्यात आला. यामध्ये लोकांचे दिवाळीच्या खरेदी बद्दल असलेले मत, खरेदीसाठीचे मध्यम आणि कोणत्या वस्तू जास्त प्रमाणत खरेदी केल्या जाऊ शकतील याची माहिती घेण्यात आली. या सर्वेक्षणानुसार 65 टक्के लोकांनी दिवाळी खरेदी करण्याबद्दल 'पॉझिटिव्ह बाइंग सेंटिमेंट' दाखविले आहेत. यामध्ये लोकांनी कपडे, मोबाइल फोन, इलेक्‍ट्रॉनिक्‍स व दुचाकी खरेदीस सर्वाधिक प्राधान्य दिले आहे. तसेच, ऑनलाईन खरेदीवर नागरिकांचा भर असल्याचे यातून स्पष्ट झाले आहे.

दिवाळीच्या दरम्यान लोकांचे खर्च करण्याचे प्रमाण वाढते आणि निरनिराळे ब्रॅंड त्यांचे लक्ष वेधण्याचा प्रयत्न करतात. यंदाची दिवाळी अनेक ब्रॅंडसाठी अतिशय महत्त्वाची ठरणार आहे. कारण ते सणासुदीसाठी जोरदार तयारी करत आहेत. सद्य परिस्थितीमध्ये अर्थव्यवस्था मंदावली असल्याने कोविडपूर्वी ग्राहकांचे खर्च करण्याचे प्रमाण कमी झाले होते. तर 2019 आणि 2020 या दिवाळीदरम्यान झालेल्या खर्चाची तुलना करता, अगोदरच्या वर्षापेक्षा 5.1 टक्केकमी खर्च होईल, अशी शक्‍यता आहे. -एन चंद्रमौली, मुख्य कार्यकारी अधिकारी - टीआरए 

'दिवाळी 2020 बाइंग प्रायॉरिटी रिपोर्ट' सर्व्हेबाबत : 
- हा सर्व्हे 9 जून ते 15 जुलै या कालावधीत घेण्यात आला. 
- यामध्ये 16 शहरांतील नागरिकांची मते घेण्यात आली. 
- राज्यातून पुणे, मुंबई व नागपूर शहरांचा समावेश. 
- सर्व्हेतून तयार झालेल्या अहवालानुसार कपडे, मोबाईल, इलेक्‍ट्रॉनिक्‍स, दुचाकी सारख्या वस्तुंना सर्वाधिक प्राधान्य 
- कार, लॅपटॉप व किचन अप्लायन्सेसला मध्यम स्वरूपाचे प्राधान्य. 
- आरोग्य विमा व घराचे नूतनीकरण सर्वात कमी प्राधान्य 
- 35 टक्के लोकांनी खरेदीबाबत कोणतेच प्राधान्य किंवा उत्साह दर्शविला नाही,. 
- तर मॉलमधून खरेदीस नागरिकांची पसंती सर्वात कमी 
- सर्व्हेमध्ये 71 टक्के पुरुष तर 29 टक्के महिलांनी सहभाग घेतला. 

- पुण्याच्या बातम्या वाचण्यासाठी येथे ► क्लिक करा

यंदाच्या दिवाळीसाठी खरेदी करताना या गोष्टींवर दिले जाणार विशेष लक्ष 

उत्पादनाशी संबंधित गोष्ट : ग्राहकांकडून मिळणारे प्राधान्य (टक्केवारीत) 
गुणवत्ता : 95 
उपयुक्तता : 89 
किंमत : 88 
खरेदीची सोय : 87 
वस्तूचे ब्रॅंड : 86

(Edited by : Sagar Diliprao Shelar)

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com