७० हजार ठेवीदारांची दिवाळी गोड, ऑक्टोबरअखेर ठेवी मिळणार

शिवाजीराव भोसले सहकारी बॅंक; केवायसींची छाननी तीन दिवसांत पूर्ण
shivajirao-Bhosale-bank
shivajirao-Bhosale-banksakal

पुणे : ठेव विमा महामंडळामार्फत (डीआयसीजीसी) शिवाजीराव भोसले सहकारी बॅंकांमधील ठेवीदारांच्या केवायसी अर्जांची छाननी प्रक्रिया तीन दिवसांत पूर्ण होणार आहे. त्यानंतर पाच लाखांच्या आतील सुमारे ७० हजार ठेवीदारांना त्यांच्या ठेवी ऑक्टोबरअखेर परत करण्यात येणार आहेत. त्यामुळे काही महिन्यांपासून अडचणीत असलेल्या ठेवीदारांची यंदाची दिवाळी गोड होणार आहे.

संचालकांच्या कथित गैरव्यवहारामुळे रिझर्व्ह बॅंकेने शिवाजीराव भोसले सहकारी बॅंकेवर निर्बंध लादले होते. त्यामुळे ठेवीदारांना त्यांच्याच खात्यातून एक हजार रुपयांच्या वर रक्कम काढता येत नव्हती. परिणामी ठेवीदारांना मोठ्या आर्थिक संकटाला सामोरे जावे लागत होते. परंतु केंद्र सरकारच्या ठेव विमा कायद्यातील सुधारणेनंतर या सहकारी बॅंकेतील ठेवीदारांनाही पाच लाखांपर्यंत रक्कम परत मिळणार आहे.

shivajirao-Bhosale-bank
राज्यात येत्या 4 दिवसांत मुसळधार पाऊस; हवामानाचा इशारा

ठेवीदारांकडून केवायसी अर्ज भरून घेण्यात येत आहेत. बॅंकेकडे १६ हजार खातेदार-ठेवीदारांचे केवायसी अर्ज प्राप्त झाले आहेत. यापूर्वीच काही ठेवीदारांचे केवायसी बॅंकेकडे जमा आहेत. ‘डीआयसीजीसी’कडून या सर्व अर्जांची छाननी जवळपास पूर्ण होत आल्याची माहिती बॅंकेचे अवसायक डॉ. आर. एस. धोंडकर यांनी दिली.

३१ मे २०२१ अखेर शिल्लक रक्कम मिळणार

ठेवीदारांच्या खात्यामध्ये ३१ मे २०२१ अखेर शिल्लक रक्कम परत करण्यात येणार आहे. ही रक्कम व्याजासह जास्तीत जास्त पाच लाख रुपयांपर्यंत असेल. ही रक्कम ठेवीदारांच्या इतर बॅंक खात्यात ऑनलाइन जमा करण्यात येईल, असे अवसायक डॉ. धोंडकर यांनी सांगितले.

"ठेव विमा महामंडळाकडून शिवाजीराव भोसले बॅंकेतील लेखापरीक्षण तीन दिवसांत पूर्ण होइल. त्यानंतर १५ दिवसांत आवश्यक कार्यवाही पूर्ण करण्यात येणार आहे. ही प्रक्रिया पूर्ण झाल्यास ऑक्टेाबरअखेरीस ठेवींचे वितरण सुरू करण्यात येणार आहे."

- आनंद कटके, सहकार उपनिबंधक, नागरी बॅंक, महाराष्ट्र राज्य

shivajirao-Bhosale-bank
दिल्लीला जाण्याआधी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे आणि शरद पवार यांची बैठक

केवायसी अर्जासोबत कागदपत्रे (झेरॉक्स दोन प्रतींमध्ये)

  • ठेव रकमेची पावती

  • दोन छायाचित्रे

  • आधार कार्ड

  • पॅन कार्ड

  • वीज बिल

  • इतर बॅंकेचा खाते क्रमांक

  • आयएफएससी कोड

बॅंकेची सद्यःस्थिती

  • शाखा : १४

  • एकूण ठेवी : ४३२ कोटी रुपये

  • ठेवीदार संख्या : ७१ हजार ७७०

  • एक लाख रुपयांच्या आतील ठेवीदार : ६३ हजार ६५८

  • एक ते पाच लाख रुपयांपर्यंत ठेवीदार : ६ हजार ३००

  • पाच लाख रुपयांवरील ठेवीदार : १ हजार ८१२

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com