
Pune Faces Huge Traffic Snarl on Expressway and Major Routes
Esakal
दिवाळीच्या सुट्ट्या आणि विकेंड यामुळे मोठ्या प्रमाणावर अनेक शहरांमध्ये वाहतूक कोंडीचं चित्र सध्या निर्माण झालं आहे. पुण्यातून बाहेर जाणाऱ्या महामार्गांवर मोठ्या प्रमाणावर वाहनांच्या रांगा लागल्या आहेत. मुंबई-पुणे एक्सप्रेस वेवर पुण्याच्या दिशेने येणाऱ्या मार्गिकेवर वाहतूक संथ गतीने सुरू आहे. मुंबई पुणे एक्सप्रेस वेसह पुणे-नगर, पुणे-नाशिक, पुणे-सातारा या मार्गांवरही वाहतूक कोंडी दिसून येत आहे. दिवाळी सणाच्या पार्श्वभूमीवर मोठ्या प्रमाणावर लोक गावी जाण्यासाठी निघाल्यानं ही वाहतूक कोंडी झालीय.