esakal | कोरोनाग्रस्तांसाठी 'ते' इंजेक्‍शन वापरण्यावर 'डीएमईआर'ने घातली बंधने
sakal

बोलून बातमी शोधा

Injection

कोरोना रुग्णांवर टोसिलीझ्युमॅब इंजेक्‍शन प्रभावी ठरत नाही, असे हे इंजेक्‍शन उत्पादन करणाऱ्या कंपनीनेच जाहीर केले आहे. कंपनीने केलेल्या सर्व्हेक्षणातून देखील हे समोर आले आहे.

कोरोनाग्रस्तांसाठी 'ते' इंजेक्‍शन वापरण्यावर 'डीएमईआर'ने घातली बंधने

sakal_logo
By
सकाळ वृत्तसेवा

पुणे : कोरोनावर टोसिलीझ्युमॅब (Tocilizumab) हे इंजेक्‍शन परिणामकारक नाही, असे उत्पादन करणाऱ्या कंपनीनेच जाहीर केले आहे. तरी देखील डॉक्‍टरांकडून त्या इंजेक्‍शनसाठी रुग्णांच्या नातेवाईकांना लिहून दिले जाते. त्यामुळे इंजेक्‍शन मिळविण्यासाठी रुग्णांच्या नातेवाईकांना करावी लागणारी धावपळ आणि डॉक्‍टरांकडून केला जाणारा सर्रास वापर थांबविण्यासाठी वैद्यकीय शिक्षण व संशोधन संचालनालयाने या इंजेक्‍शनवरच बंधने घातली आहेत. 

Ganeshotsav 2020 : १२८ वर्षांत पहिल्यांदाच मिरवणूकीविना होणार बाप्पाचं विसर्जन!

शहरात कोरोनाचा विषाणूंचा उद्रेक वाढत आहे. सध्या शहरात 15 हजार 423 कोरोनाबाधीत रुग्ण उपचारासांठी शहरातील वेगवेगळ्या रुग्णालयांमध्ये दाखल आहेत. त्यापैकी 834 रुग्ण अत्यवस्थ आहेत. या आधी कोरोनाबाधीत रुग्णांसाठी त्यांच्या नातेवाईकांना ऑक्‍सिजन बेड किंवा व्हेंटीलेटर मिळण्यासाठी धावा-धाव करावी लागत होती. पण, गेल्या काही दिवसांमध्ये महापालिकेने उचललेल्या पावलांमुळे बेड मिळत आहेत. रुग्णाची ऑक्‍सिजनची गरज पूर्ण होते. मात्र, या दरम्यान उपचारासाठी लागणारे रॅमडेसिव्हीर आणि टोसिलीझ्युमॅब हे इंजेक्‍शन डॉक्‍टरांना मिळवून देण्यासाठी रुग्णाच्या नातेवाईकांना अक्षरशः जीवाच्या आकांताने धावपळ करावी लागत असल्याचे चित्र शहरात होते. 

विद्यार्थ्यांनो पुणे विद्यापीठात अॅडमिशन घ्यायचंय? तुमच्याकडे आहे शेवटची संधी

कोरोना रुग्णांवर टोसिलीझ्युमॅब इंजेक्‍शन प्रभावी ठरत नाही, असे हे इंजेक्‍शन उत्पादन करणाऱ्या कंपनीनेच जाहीर केले आहे. कंपनीने केलेल्या सर्व्हेक्षणातून देखील हे समोर आले आहे. त्यामुळे मूळची जर्मन असलेल्या या कंपनीने गेल्या 20 ते 25 दिवस या इंजेक्‍शनचा पुरवठा करणे थांबविले आहे. परिणामी महाराष्ट्रासह पुण्यात त्यांचा तुटवडा निर्माण झाला आहे. एकीकडे ही परिस्थिती असताना देखील डॉक्‍टरांकडून त्यासाठी आग्रह धरला जात आहे. त्यामुळे प्रति इंजेक्‍शन 40 ते 42 हजार रूपये नागरीकांना मोजावे लागत आहे. इंजेक्‍शनची किंमत आणि त्यांचा तुटवडा या संदर्भात जिल्हा प्रशासनाकडे देखील मोठ्या प्रमाणावर तक्रारी दाखल झाल्या होत्या. या सर्व पार्श्‍वभूमीवर वैद्यकीय शिक्षण व संसोधन संचालयाने हे इंजेक्‍शन वापरण्यावरच बंधने आणली आहे. तसे परिपत्रक संचालयाने जारी केले आहे.

जिल्हा परिषद आणि 'पीएमआरडीए'च्या महसूलला बसणार फटका; राज्य सरकारच्या चलाखीचा परिणाम​

टोसिलीझ्युमॅब इंजेक्‍शन हे कोरोना बाधित रूग्णांवर उपचारासाठी परिणामकारक नाही, असे कंपनीनेच जाहीर केले आहे. कंपनीने पुरवठा बंद केल्यामुळे बाजारात देखील त्याचा तुटवडा निर्माण झाला आहे. परंतु डॉक्‍टरांकडून त्यांचा सर्रास वापर केला जात आहे. तसेच रूग्णांच्या नातेवाईकांमध्ये हे इजेक्‍शन प्रभावी असल्याचा गैरसमज आहे. त्यामुळे ते वापरण्यावर बंधने घालण्यात आली आहे. 
- डॉ. तात्याराव लहाने (संचालक, वैद्यकीय शिक्षण व संसोधन संचालनालय)

- पुण्याच्या बातम्या वाचण्यासाठी येथे ► क्लिक करा

(Edited by : Ashish N. Kadam)