

‘षण्मुगम यांचा दावा खोटा’
द्रमुक आणि अण्णाद्रमुक यांच्यात युतीबाबत चर्चा झाल्याचा अण्णाद्रमुकचे नेते सी. वे. षण्मुगम यांनी केलेला दावा द्रमुकने मंगळवारी फेटाळून लावला. षण्मुगम स्वतःच्या पक्षात फूट पाडण्याचा प्रयत्न करत असल्याचा आरोपही द्रमुकने केला. द्रमुकच्या संघटन सरचिटणीस आर. एस. भारती यांनी दावा केला की, षण्मुगम यांनी विजय यांच्या नेतृत्वाखालील टीव्हीके सरकारला पाठिंबा देण्याचा निर्णय घेतला असून, त्यामुळेच त्यांनी द्रमुक-अण्णाद्रमुक निवडणुकीनंतरच्या युतीबाबत निराधार आरोप केला. द्रमुक हा विरोधी पक्ष काम करेल असे स्पष्ट करतानाच भारती म्हणाले की ‘‘निवडणुकीचे निकाल लागल्यानंतर आम्ही आधीच स्पष्ट केले होते की, हे वृत्त केवळ तर्कवितर्क आणि अफवा आहेत.” विधानसभेतही द्रमुक विधिमंडळ पक्षाचे नेते उदयनिधी स्टॅलिन यांनी द्रमुक विरोधी पक्ष म्हणून काम करेल, असेही त्यांनी सांगितले.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.