'डीएमयू'चे वेळापत्रक जाहीर

सकाळ वृत्तसेवा
शनिवार, 25 मार्च 2017

दौंडहून पुण्याला येणाऱ्या प्रवाशांकडे प्रशासनाचे दुर्लक्ष
पुणे - पुणे-दौंड मार्गावर नव्याने सुरू होत असलेल्या "डीएमयू'चे वेळापत्रक रेल्वे प्रशासनाकडून जाहीर करण्यात आले आहे; मात्र यामध्ये दौंडहून पुण्याला येणाऱ्या नोकरदारांना विचारात घेतले नसल्याने दौंडकरांकडून त्याला विरोध होण्याची शक्‍यता व्यक्त केली जात आहे.

रेल्वेमंत्री सुरेश प्रभू हे व्हिडिओ कॉन्फरन्सिंगद्वारे शनिवारी (ता. 25) दुपारी 12.45 वाजता "डीएमयू'ला हिरवा झेंडा दाखविणार आहेत. त्यानंतर ही गाडी पुणे स्थानकावरून दौंडसाठी रवाना होईल.

रविवारपासून या मार्गावर "डीएमयू' नियमितपणे धावणार आहे. पुणे-दौंड-पुणे अशा एकूण चार फेऱ्या होतील.

दौंड आणि त्यामार्गाहून पुण्याला येणाऱ्या नोकरदार व विद्यार्थ्यांचे प्रमाण अधिक आहे. या मार्गावरील एकूण सुमारे साठ हजार प्रवाशांमधील 80 टक्के प्रवासी हे दौंड, केडगाव, उरळी व लोणी परिसरातील असतात. या प्रवाशांना सकाळी पुण्यात दाखल होण्यासाठी पहाटे चार वाजल्यापासून रेल्वे स्थानकावर येऊन बसावे लागते. त्यातही अनेक गाड्यांना उशीर होतो. त्यामुळे नोकरी किंवा कॉलेजला जाणाऱ्यांना विलंब होतो. सातत्याने उशिरा येणाऱ्या गाड्यांमुळे केडगाव येथे प्रवाशांनी रेल्वे रोको केला होता. या पार्श्‍वभूमीवर दौंड लोकलही प्रामुख्याने दौंडच्या प्रवाशांच्या समस्या सोडविणारी ठरेल, असे बोलले जात होते; मात्र प्रत्यक्षातील स्थिती वेगळीच असल्याचे वेळापत्रकानंतर स्पष्ट झाले.

पुणे स्थानकावरून सुटणार
सकाळी 10.30 वाजता
दुपारी 2.20 वाजता

दौंड स्थानकावरून सुटणार
दुपारी 12.45 वाजता
दुपारी 4.18 वाजता

Web Title: dmu timetable declare