स्वाईन फ्ल्यू नियंत्रणासाठी जनजागृती करा : जिल्हाधिकारी

download (3).jpg
download (3).jpg

पुणे : "पुणे शहर व परिसरात झालेल्या वातावरणातील बदलामुळे स्वाईन फ्ल्यूच्या रुग्णांची संख्या वाढत असल्याने या आजाराच्या उपचार पद्धतीबाबत आरोग्य विभागांच्या सर्व यंत्रणांनी कार्यक्षपणे अंमलबजावणी करावी. आजाराबाबत घ्यावयाच्या दक्षतेविषयी जास्तीत जास्त नागरिकांपर्यंत मार्गदर्शक सूचना पोहचवण्यासाठी उपाययोजना कराव्यात,'' अशा सूचना जिल्हाधिकारी नवल किशोर राम यांनी बुधवारी दिल्या.
 
जिल्हाधिकारी कार्यालयात जिल्हा रुग्णालय आणि जिल्हा परिषदेचा आरोग्य विभाग यांच्यातर्फे स्वाईन फ्ल्यू आजारावर रोगनिदान उपचार व प्रतिबंध कार्यशाळेचे आयोजन करण्यात आले होते. त्यावेळी ते बोलत होते. यावेळी जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी सूरज मांढरे, आरोग्य विभागाचे सहाय्यक संचालक प्रदीप आवटे, अतिरिक्त जिल्हा शल्यचिकित्सक डॉ. भगवान काकणे, जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ. दिलीप माने, निवासी वैद्यकीय अधिकारी सदाशिव जगदाळे आदी उपस्थित होते. 

राम म्हणाले, "स्वाईन फ्ल्यू या आजारावरील उपचारांची अंमलबजावणी करताना पुणे जिल्हयातील सर्व यंत्रणांनी दक्ष राहणे आवश्‍यक आहे. वातावरणातील बदल व पूर्वानुभव लक्षात घेता सर्वेक्षण, निदान, उपचार, आरोग्य विषयक शिक्षण व प्रशिक्षण आदी बाबींकडे लक्ष देण्यात यावे. स्वाईन फ्ल्यू संदर्भातील मार्गदर्शक सूचना सर्व सरकारी आणि खाजगी रुग्णालयात ठळकपणे प्रदर्शित करव्या.'' शाळा, अंगणवाडी या ठिकाणी जाऊन चाचणी करण्याच्या सूचनाही त्यांनी दिल्या. यावेळी त्यांनी औषध साठयाचीदेखिल माहिती घेतली. 
 

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com