प्रदर्शनापासून दूर राहत स्वदर्शन करावे :  जैन साध्वी सम्यकदर्शनाजी  

प्रफुल्ल भंडारी
बुधवार, 25 जुलै 2018

दौंड (पुणे) : प्रदर्शनापासून दूर राहत स्वदर्शन करावे. अत्याधिक चांगली कर्म करून मानवी जीवनाचे कल्याण करावे, असे आवाहन जैन महासती सम्यकदर्शनाजी यांनी केले आहे.

दौंड शहरात चातुर्मास प्रवेश निमित्त श्री वर्धमान स्थानकवासी जैन श्रावक संघाच्या स्थानकात आयोजित विशेष प्रवचनात महासती सम्यकदर्शनाजी यांनी हे आवाहन केले. साध्वी रत्नदर्शनाजी व साध्वी तेजसदर्शनाजी या वेळी उपस्थित होत्या. प्रवेश निमित्त प्रमुख चौकांमधून जैन आगम ग्रंथांची मिरवणूक काढण्यासह तीर्थंकर आणि संतांचा जयघोष करण्यात आला. 

महासती सम्यकदर्शनाजी प्रवचनात म्हणाल्या, ``सध्या वास्तव स्वीकारण्यापेक्षा कोणत्याही गोष्टीचे प्रदर्शन करण्यावर भर दिला जात असून ते योग्य नाही. स्वदर्शन केल्याने आपणास आपली बलस्थाने आणि उणिवांची जाणीव होईल. आपल्या बोलण्यात आणि वागण्यात एकवाक्यता असावी. क्रोध, मान, माया व लोभ हे चार कषाय मानवी जीवन असह्य करीत असल्याने त्यांचे वेळीच शमन करावे. दैनंदिन जीवनात प्रमाद करू नये. आपणास उपलब्ध प्रत्येक क्षणाचा सदुपयोग करावा. संधी प्रत्येकाला मिळते मात्र त्या संधीचे सोने करण्यासाठी सदैव दक्ष राहावे. सर्वांशी मैत्रीभाव ठेवत प्रत्येक जीवाचा आदर करावा. 

श्री वर्धमान श्वेतांबर स्थानकवासी जैन श्रावक संघाचे संघपती शांतिलाल मुनोत यांनी स्वागत करीत मनोगत व्यक्त केले. बालिका मंडल, प्रगती बहु मंडल आणि मंगल सरनोत यांनी या वेळी स्वागत गीत व स्तवन सादर केले. चातुर्मास काळात नित्य सामूहिक प्रार्थना, व्याख्यान, आगम अध्ययन, प्रतिक्रमण, आदी उपक्रमांध्ये सहभागी होण्याचे आवाहन श्री. मुनोत यांनी या वेळी केले. 

Web Title: Do away from the exhibition: Jain Sadhvi Samyakkadarshanji