"वीज यंत्रणेजवळ कचरा जाळू नका'

सकाळ वृत्तसेवा
सोमवार, 8 मे 2017

नगररस्ता परिसरात उघड्यावर टाकलेला कचरा अचानक पेटल्याने तेथील 22 केव्ही व 11 केव्हीच्या चार केबल जळाल्या.

पुणे : शहरी व ग्रामीण भागातील वीजयंत्रणेजवळच मोठ्या प्रमाणात कचरा टाकला जात असल्याने अनेक ठिकाणी वीजयंत्रणेला धोका निर्माण झाला आहे. त्यामुळे "नागरिकांनो, अशा यंत्रणेजवळ कचरा टाकू नका आणि जाळूही नका' असे आवाहन महावितरणने केले आहे.

नगररस्ता परिसरात उघड्यावर टाकलेला कचरा अचानक पेटल्याने तेथील 22 केव्ही व 11 केव्हीच्या चार केबल जळाल्या. त्यामुळे येरवडा, नगररस्ता, विश्रांतवाडी, धानोरी परिसरातील वीजपुरवठा खंडित झाला होता.

यात महावितरणचे तर नुकसान झालेच, शिवाय नागरिकांचीही मोठी गैरसोय झाली. त्यामुळे नागरिकांनीही दक्षता घ्यावी. ओव्हरहेड वीजतारांखाली असलेल्या कचऱ्याचा ढिगारा पेटविल्यास विजेच्या तारा वितळून पुरवठा खंडित होण्याचा धोका असतो, असेही महावितरणने म्हटले आहे.

Web Title: do not burn garbage near electric systems

टॅग्स