मागील निवडणुकीतील चूक पुन्हा करू नका - अजित पवार

सकाळ वृत्तसेवा
शुक्रवार, 13 एप्रिल 2018

वडगाव शेरी  - लोकसभा आणि विधानसभेच्या निवडणुका कधीही जाहीर होतील, त्यासाठी राष्ट्रवादी चांगले उमेदवार देईल. तेव्हा पुण्याच्या विकासासाठी राष्ट्रवादीला साथ द्या. मागील निवडणुकीत केलेली चूक पुन्हा करू नका, असे सांगून पक्षाचे नेते अजित पवार यांनी आगामी निवडणुकांसाठी तयार राहण्याचे संकेत दिले. 

हल्लाबोल आंदोलनानिमित्त खराडीत झालेल्या सभेत पवार बोलत होते. विरोधी पक्षनेते धनंजय मुंडे, सुनील तटकरे, सुप्रिया सुळे, आदी या वेळी उपस्थित होते. 

पवार म्हणाले, ""राज्यातील महिला, युवती आणि बालिकाही असुरक्षित आहेत. सरकारने गेल्या चार वर्षांत एकही नवा उद्योग आणला नाही. सामान्य नागरिक, शेतकरी, छोटे उद्योजक सरकारच्या धोरणामुळे भरडले जात आहेत.'' 

"शालेय आणि महाविद्यालयीन परीक्षांचे पेपर फुटत आहेत. त्यात पालक आणि विद्यार्थ्यांचा दोष काय? पिण्याच्या आणि शेतीच्या पाण्याचे नियोजन आम्ही करायचो, ते या सरकारला जमले नाही. कचऱ्याचा प्रश्‍न सोडवता आलेला नाही, असेही पवार यांनी सांगितले. मुंबईतील शिवस्मारक, इंदू मिल यावरूनही पवार यांनी सरकारवर टीका केली. 

त्यांचा विचार करत नाही 
निवडणुकीआधी राष्ट्रवादीतून बाहेर पडलेल्या मंडळींना आता सोबत घेणार का, यावर पवार म्हणाले, "अशा लोकांना पुन्हा पक्षात घेऊ नको,' हे बहिणीने कालच सांगितले आहे. त्यामुळे त्यांना पुन्हा पक्षात घेण्याचा प्रश्‍न येत नाही. महायुतीतील घटक पक्षांशी सोबत घेण्याबाबत चर्चा केली. ते चर्चा करतात; पण आयत्या वेळी वरिष्ठांना विचारून सांगतो, असे म्हणतात. त्यांचा आता विचार करत नाही, असे पवार म्हणाले. 

दहा जूनला शरद पवारांची सभा 
सरकारविरोधात हल्लाबोल आंदोलनाची सांगता सभा राष्ट्रवादीच्या स्थापना दिवशी येत्या दहा जूनला पक्षाचे अध्यक्ष शरद पवार यांच्या उपस्थितीत पुण्यात होणार आहे. 

Web Title: Do not repeat mistakes in previous elections - Ajit Pawar