शैक्षणिक संकुलात पूजा नको - सुळे 

सकाळ वृत्तसेवा
शनिवार, 25 ऑगस्ट 2018

पुणे - शैक्षणिक संकुलात पूजा नको. ज्या काही पूजा घालायच्या तर त्या स्वतःच्या घरी घाला; हा पुरोगामी विचाराचा महाराष्ट्र आहे. पूजा करण्याला आमचा विरोध नाही, असे मत खासदार सुप्रिया सुळे यांनी येथे व्यक्त केले. 

पुणे - शैक्षणिक संकुलात पूजा नको. ज्या काही पूजा घालायच्या तर त्या स्वतःच्या घरी घाला; हा पुरोगामी विचाराचा महाराष्ट्र आहे. पूजा करण्याला आमचा विरोध नाही, असे मत खासदार सुप्रिया सुळे यांनी येथे व्यक्त केले. 

महापालिकेत नव्याने समाविष्ट केलेली 11 गावे आणि बारामती लोकसभा मतदारसंघातील महापालिका हद्दीत असलेल्या भागांतील गावांतील प्रश्‍नांविषयी पुणे महापालिकेत खासदार सुळे यांच्या अध्यक्षतेखाली बैठक पार पडली. त्या बैठकीला महापालिका आयुक्त सौरभ राव, विरोधी पक्षनेते चेतन तुपे, विशाल तांबे, राष्ट्रवादी कॉंग्रेसचे विद्यमान आणि माजी नगरसेवक आदी उपस्थित होते. या बैठकीनंतर पत्रकारांशी बोलताना सुळे यांनी फर्ग्युसन महाविद्यालयात पार पडलेल्या सत्यनारायण पूजेसंदर्भात मत व्यक्त केले. 

राज्यात महिलांवर होणाऱ्या अन्याय आणि अत्याचाराच्या प्रश्‍नाकडे मुख्यमंत्री गांभीर्याने पाहत नाहीत. महिलांच्या सुरक्षेकडे लक्ष देता नसेल तर त्यांनी स्वत:कडे असलेले गृहमंत्रीपद दुसऱ्या कोणाला द्यावे, अशी टीकाही सुळे यांनी एका प्रश्‍नावर उत्तर देताना केली. तत्पूर्वी झालेल्या बैठकीत फुरसुंगी, सिंहगड रस्ता, शिवणे, उत्तमनगर आदी भागांतील विविध नागरी प्रश्‍नांविषयी प्रशासनाला योग्य ती कार्यवाही करण्यास सांगितले. पाणीपुरवठा योजना, रस्तेबांधणी, खराब रस्त्यांची दुरुस्ती, कचरा प्रश्‍न आदी विषयांवर या बैठकीत चर्चा झाली. स्वारगेट ते कात्रज या मेट्रो मार्गाचा अहवाल लवकर तयार करावा. त्याचप्रमाणे स्वारगेट ते खडकवासला या मेट्रो मार्गाचा प्रकल्प अहवाल तयार करण्यास प्राधान्य द्यावे, त्यासाठी महापालिकेने निधी उपलब्ध करून द्यावा, अशी मागणी त्यांनी या वेळी केली. 

Web Title: Do not worship in the educational institute says Sule