सांगवी "मधुबन" मधील प्रलंबित कामे मार्गी लावा-अतुल शितोळे

सकाळ वृत्तसेवा
गुरुवार, 30 ऑगस्ट 2018

जुनी सांगवी - जुनी सांगवी येथील मधुबन सोसायटी अंतर्गत रखडलेली रस्ता व अन्य नागरी सुविधांची रखडलेली विविध विकास कामे मार्गी लावावीत. याबाबत माजी स्थायी अध्यक्ष अतुल शितोळे यांनी पालिका आयुक्तांकडे निवेदनाद्वारे मागणी केली आहे. 

जुनी सांगवी - जुनी सांगवी येथील मधुबन सोसायटी अंतर्गत रखडलेली रस्ता व अन्य नागरी सुविधांची रखडलेली विविध विकास कामे मार्गी लावावीत. याबाबत माजी स्थायी अध्यक्ष अतुल शितोळे यांनी पालिका आयुक्तांकडे निवेदनाद्वारे मागणी केली आहे. 

निवेदनात म्हटले आहे की,राष्ट्रवादी काँग्रेसच्या कार्यकाळात माजी उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या हस्ते २०१७ मध्ये येथील कामांचे भुमिपुजन करण्यात आले होते. यात अंतर्गत सिमेंट रस्ते, भुयारी गटार, रस्त्यांच्या दोन्ही बाजुंनी नविन जलवाहिनी,ईंटरनेट सेवा आदी कामांचा समावेश आहे. जवळपास सुमारे दहा कोटी रूपये या कामांची निविदा आहे. या कामाची मुदत १८ महिने असताना ही कामे जाणिवपूर्वक संथगतीने सुरू आहेत. यामुळे मुळ अंदाजपत्रकापेक्षा या कामाचा वाढीव खर्च होणार आहे. हा आर्थिक बोजा नागरीकांच्या कररूपी पैशांवर पडणार आहे. तर या भागात चुकीच्या पद्धतीने काही कामे होत आहेत. 

मधुबन सोसायटीत सात मिटरच्या आत पादचारी रस्ते करण्याची आवश्यकता नसताना येथे केले जात आहेत.यामुळे आधिच अरूंद असलेले रस्ते अजुन अरूंद झाले आहेत.याच बरोबर येथील वेताळ महाराज सोसायटी, शांतीनगर, शिक्षक सोसायटी, शितोळेनगर रस्ता क्रं दोन या सिमेंट रस्त्यांना मंजुरी असताना जाणिवपुर्वक दुर्लक्ष केले जात आहे. त्यामुळे तातडीने या रस्त्यांची कामे सुरू करावीत व प्रलंबित कामे मार्गी लावावीत असे निवेदनात म्हटले आहे. 

Web Title: do the Pending works in Sangvi "Madhuban" -Atul Shiteole