नाचण्यापेक्षा वाचण्याने मोठे व्हाल - सत्यपाल महाराज

रमेश मोरे
बुधवार, 18 एप्रिल 2018

जुनी सांगवी (पुणे) : नाचुन जयंत्या साजऱ्या करण्यापेक्षा पुस्तके वाचुन मोठे व्हा. आजची तरूणाई पाश्चमात्य संस्कृतीच्या विळख्यात अडकत चालली आहे. छत्रपती शिवाजी महाराज क्रांतीसुर्य महात्मा जोतिबा फुले, डॉ.बाबासाहेब आंबेडकर, छत्रपती शाहु महाराज, साहित्य रत्न आण्णाभाऊ साठे या थोर महापुरूषांचा विचार, आचार आचणार आणा असे जुनी सांगवी येथे संयुक्त जयंती महोत्सवात सप्त खंजिरी वादक समाजप्रबोधनकार सत्यपाल महाराज यांनी व्यक्त केले.

जुनी सांगवी येथे फिनिक्स सोशल ऑर्गनायझेशनच्या वतीने डॉ.बाबासाहेब आंबेडकर,छत्रपती शिवाजी महाराज,महात्मा जोतीबा फुले,भगवान गौतम बुद्ध यांच्या संयुक्त जयंती महोत्सवाचे आयोजन करण्यात आले आहे. तीन दिवसीय संयुक्त जयंती महोत्सवाच्या पहिल्या दिवशी समाज प्रबोधनकार श्री सत्यपाल महाराज यांचे व्याख्यान आयोजित करण्यात आले होते. ते म्हणाले,सध्या जयंती उत्सवाला आधुनिक व भौतिक बाज आला आहे.विचार आदर्श बाजुला ठेवुन सुरू दुराचार वाढत चालला आहे.

महापुरूषांच्या विचारांची आदर्शांची जयंती साजरी व्हावी.असे यावेळी त्यांनी बोलताना व्यक्त केले.कार्यक्रमाचे उद्घाटन पिंपरी चिंचवड महापालिकेचे आयुक्त श्री श्रावण हर्डीकर यांच्या हस्ते दिपप्रज्वलन करून करण्यात आले.यावेळी अतिरिक्त आयुक्त दिलीप गावडे ,  आरोग्य अधिकारी मनोज लोणकर, डॉ. पवन साळवे, " ह" प्रभाग प्रशासन अधिकारी आशा राऊत, "ह " प्रभाग अध्यक्ष अंबरनाथ कांबळे , नगरसेवक,संतोष कांबळे,हर्षल ढोरे, जवाहर ढोरे , शारदा सोनवणे,हिरेन सोनवणे,उद्योजक संजय शेठ जगताप, आदी मान्यवर उपस्थित होते. कार्यक्रम यशस्वितेसाठी रवी यादव , राहुल विधाते, संदीप खोकराळे, नामदेव आरसकार, निमिष कांबळे, योगेश कांबळे,विक्रम कदम आदींनी परिश्रम घेतले.

Web Title: do read yo can achieve goo something said by satyapal maharaj