पालखी मार्गाची कामे करा - मुक्ता टिळक

सकाळ वृत्तसेवा
मंगळवार, 12 जून 2018

पुणे : संत ज्ञानेश्‍वर महाराज आणि संत तुकाराम महाराज यांच्या पालखी सोहळ्यांचे 7 जुलै रोजी शहरात आगमन होणार आहे. या पार्श्‍वभूमीवर महापौर मुक्ता टिळक यांनी अधिकाऱ्यांसोबत पालखी मार्गांची पाहणी केली. अपूर्ण अवस्थेतील कामे तातडीने पूर्ण करण्याच्या सूचना त्यांनी संबंधितांना दिल्या आहेत. 

पालखीचे शहरात आगमन झाल्यानंतर वारकऱ्यांची गैरसोय होऊ देणार नसल्याची ग्वाही महापौरांनी या वेळी दिली. नगरसेवक प्रकाश ढोरे, शीतल सावंत, सुनीता वाडेकर, आदित्य माळवे, अमोल बालवडकर, विशाल धनवडे, अजय खेडेकर, नाना सांगडे, लक्ष्मी आंदेकर, सुलोचना कोंढरे, मनीषा लडकत, महापालिकेच्या अतिरिक्त आयुक्त शीतल उगले-तेली, राजेंद्र निंबाळकर, माधव देशपांडे, विजय लांडगे आदी उपस्थित होते. कळस-धानोरी, औंध-बोपोडी, संगमवाडी, पाटील इस्टेट, निवडुंग्या विठोबा मंदिर व पालखी विठोबा या पालखी तळांची या वेळी पाहणी केली. 

पालखी तळावर सीसीटीव्ही बसवा 
पालखी मार्गावर अडथळा ठरणारी बेवारस वाहने, कचरा, राडारोडा उचलावा, खड्ड्यांची डागडुजी करावी, पालखी कालावधीत 24 तास पाणीपुरवठा करावा, आरोग्यविषयक सुविधा पुरवाव्यात, मोबाईल टॉयलेट व स्वच्छतागृहांची व्यवस्था पुरवावी, पालखी मार्गाची स्वच्छता करावी आणि पालखी तळावर सीसीटीव्ही कॅमेरे बसवावेत इत्यादी सूचना महापौरांनी प्रशासनाला केलेल्या आहेत. शहरात आल्यानंतर वारकऱ्यांची गैरसोय होऊ नये, म्हणून आवश्‍यक त्या उपाययोजना करण्याची सूचनाही त्यांनी केली. 
 
Web Title: Do the tasks of Palkhi Marg - Mukta Tilak