esakal | पुण्यात 'जम्बो' पळवापळवी; ठेकेदाराकडून डॉक्‍टरांना केलं जातंय 'हायजॅक'!
sakal

बोलून बातमी शोधा

Coronavirus-Doctors

कोरोनाच्या साथीत रुग्णांच्या सेवेसाठी पुण्यातील शासकीय आभियांत्रिकी महाविद्यालय (सीओईपी) आणि पिंपरी-चिंचवडमध्ये जम्बो कोविड केअर सेंटर उभाण्यात आले आहे.

पुण्यात 'जम्बो' पळवापळवी; ठेकेदाराकडून डॉक्‍टरांना केलं जातंय 'हायजॅक'!

sakal_logo
By
सकाळ वृत्तसेवा

पुणे : पुण्यात जम्बो कोविड केअर सेंटरच्या उद्घाटनांचा सपाटा सुरू आहे खरा; मात्र या सुविधेसाठी डॉक्‍टरांची फौज उभारताना, महापालिका आणि खासगी हॉस्पिटलमधील डॉक्‍टरांची पळवापळवी केली जात असल्याचा प्रकार उघडकीस आला आहे. जादा पगार आणि अन्य सेवा पुरविण्याचा शब्द देत 'जम्बो'च्या ठेकेदाराकडून डॉक्‍टरांना 'हायजॅक' केले जात असल्याचे वास्तव डॉक्‍टरांनीच पुढे केले आहे. या साऱ्या प्रकारावर महापालिकेतील सत्ताधारी भाजपने आक्षेप घेतला असून, ''तुमच्याकडे डॉक्‍टरच नसतील, तर जम्बो सेंटर का म्हणता, असा प्रश्‍न विचारला आहे. 

मुख्यमंत्री जरा डोळे उघडा अन् मातोश्रीच्या बाहेर पडा..राजू शेटी यांची टीका​

कोरोनाच्या साथीत रुग्णांच्या सेवेसाठी पुण्यातील शासकीय आभियांत्रिकी महाविद्यालय (सीओईपी) आणि पिंपरी-चिंचवडमध्ये जम्बो कोविड केअर सेंटर उभाण्यात आले आहे. दोन्ही ठिकाणी सुमारे 1 हजार 600 रुग्णांना सामावून घेतले जाणार आहे. ही प्रशस्त सेवा उभारताना त्यासाठी तज्ज्ञ डॉक्‍टरांची फौजही पुरविण्याचे नियोजन करण्यात आले आहे. या साऱ्या कामांसाठी कोट्यवधी रुपये मोजून ठेकेदार नेमण्यात आला आहे. आपली सेवा सरस ठरविण्यासाठी ठेकेदार कंपनी 24 तास डॉक्‍टर आणि परिचारिका पुरविणार आहे.

मोठी बातमी : घरांचे दर होणार कमी; राज्य सरकारने घेतला महत्त्वाचा निर्णय!

एवढ्या प्रमाणात सहजासहजी डॉक्‍टर उपलब्ध करताना ठेकेदाराच्या नाकीनऊ आले आहे. त्यावर शक्कल लढवत महापालिकेतील कंत्राटी डॉक्‍टर, परिचारिकांसह खासगी हॉस्पिटलमधील डॉक्‍टरांना मोठ्या पगाराचे आमिष दाखवले जात आहे. त्यातून काही डॉक्‍टरांना आपल्याकडे खेचण्यात ठेकेदाराला यश आले आहे. परिणामी, अशा प्रकारे डॉक्‍टरांना निरनिराळे आमिष दाखविणाऱ्या महापालिकेतील सत्ताधारी भाजपचे नगरसेवक प्रवीण चोरबेले यांनी आक्षेप घेतला आहे. 

अजित पवार- फडणवीस पुन्हा एका मंचावर; काय बोलणार याकडे पुणेकरांचे लक्ष

चोरबेले म्हणाले, ''एकाचवेळी शेकडो रुग्णांना सेवा पोचविण्याची क्षमता असल्याचे दाखवून ठेकेदारांनी कामे मिळविली आहेत. त्यानंतर मात्र, महापालिकेचेच डॉक्‍टर घेऊन काम चालविण्याचा प्रयत्न करीत आहेत. ज्यामुळे पुण्यातील कोरोना रुग्णांचे हाल होण्याची भीती आहे. अशा काळात पैशांचे अमिष दाखवून डॉक्‍टरांना आपल्याकडे घेण्याचा प्रकार धक्कादायक आहे.'' 
पुणे आणि पिंपरी-चिंचवड शहरातील नागरिकांच्या सुरक्षिततेसाठी दोनशे कोटी रुपये खर्च करून दोन जम्बो कोविड केअर सेंटर उभारण्यात आले आहेत. तेही दोन्ही सुरू झाले असून, पुढच्या काळात डॉक्‍टरांची कमतरता भासण्याची गरज आहे.

- पुण्याच्या बातम्या वाचण्यासाठी येथे ► क्लिक करा

(Edited by : Ashish N. Kadam)

loading image