esakal | बारामतीतील डॉक्टर म्हणताहेत, ...तर कोविड केअर सेंटर बंद करणार
sakal

बोलून बातमी शोधा

docter.jpg

शहरातील डॉ. सुजित अडसूळ यांच्यावर झालेल्या हल्ल्यातील आरोपीस येत्या 48 तासांत अटक न झाल्यास शहरातील डॉक्टर खासगी कोविड केअर सेंटर सर्वानुमते बंद करतील, असा इशारा आज शहरातील डॉक्टरांनी दिला. 

बारामतीतील डॉक्टर म्हणताहेत, ...तर कोविड केअर सेंटर बंद करणार

sakal_logo
By
मिलिंद संगई

बारामती (पुणे) : शहरातील डॉ. सुजित अडसूळ यांच्यावर झालेल्या हल्ल्यातील आरोपीस येत्या 48 तासांत अटक न झाल्यास शहरातील डॉक्टर खासगी कोविड केअर सेंटर सर्वानुमते बंद करतील, असा इशारा आज शहरातील डॉक्टरांनी दिला. 
- पुण्याच्या बातम्या वाचण्यासाठी येथे ► क्लिक करा

या हल्लाप्रकरणी आज सर्व डॉक्टरांनी उपविभागीय अधिकारी दादासाहेब कांबळे, उपविभागीय पोलिस अधिकारी नारायण शिरगावकर, पोलिस निरिक्षक औदुंबर पाटील यांना या वेळी निवेदन देण्यात आले. या प्रसंगी डॉ. संजय पुरंदरे, डॉ. विभावरी सोळुंके, डॉ. सुजित अडसूळ, डॉ. राहुल जाधव आदींनी या प्रसंगी भावना व्यक्त केल्या. कोरोनाच्या काळात डॉक्टर चोवीस तास काम करीत आहेत, अशा काळात त्यांचे मनोधैर्य वाढविण्याऐवजी हल्ला होतो, ही बाब निंदनीय आहे. प्रशासनाने या प्रसंगी डॉक्टरांच्या पाठीशी उभे राहावे, अशी अपेक्षा या सर्वांनी व्यक्त केली. 

Breaking : राज्य सरकारने रेडी-रेकनरच्या दरात केली वाढ; सर्वाधिक पुणे जिल्ह्यात तर...

उपविभागीय पोलिस अधिकारी नारायण शिरगावकर यांनी येत्या 48 तासात आरोपीस अटक केली जाईल, तसेच त्याच्याविरुध्दचा हा दुसरा गुन्हा असून, संबंधिताच्या तडीपारीचा प्रस्ताव पाठविला जाईल, अशी ग्वाही दिली. दादासाहेब कांबळे यांनीही प्रशासन डॉक्टरांच्या पाठीशी आहे, एका व्यक्तीने केलेला हा हल्ला असल्याने सर्व समाजाला डॉक्टरांनी जबाबदार धरु नये, असे आवाहन केले. पोलिसांनी सर्वच कोविड केअर सेंटर व डॉक्टरांना सुरक्षा पुरविण्याची ग्वाही दिल्याचेही ते म्हणाले. 

ताज्या बातम्यांसाठी डाऊनलोड करा ई-सकाळचे ऍप

या प्रसंगी पोलिस निरिक्षक औदुंबर पाटील, मुख्याधिकारी किरणराज यादव, गटविकास अधिकारी राहुल काळभोर, गटनेते सचिन सातव, तालुका आरोग्य अधिकारी डॉ. मनोज खोमणे, डॉ. सदानंद काळे यांच्यासह अमर पवार, सुजित अडसूळ, संतोष घालमे, अविनाश आटोळे, राजेंद्र चोपडे, तुषार गदादे, आशिष जळक, प्रशांत मांडण, पांडुरंग गावडे, राजेश कोकरे, चंद्रशेखर धुमाळ, जितेंद्र आटोळे, सचिन घोरपडे, सचिन घोळवे, सूरज भगत, हर्षल राठी, प्रदीप व्होरा, डी. एन. धवडे, विशाल मेहता, प्रशांत माने, चंद्रशेखर पिल्ले, दिनेश ओसवाल, आनंद हारके, प्रितम ललगुणकर, वृषाली हारके, भास्कर जेधे आदी डॉक्टर या प्रसंगी उपस्थित होते. 

loading image
go to top