"उतारा' देणाऱ्या डॉक्‍टरच्या पोलिस कोठडीत वाढ 

सकाळ वृत्तसेवा
मंगळवार, 3 एप्रिल 2018

पुणे - दीनानाथ मंगेशकर रुग्णालयात रुग्णावर उतारा करून अंधश्रद्धेला चालना देणाऱ्या डॉक्‍टरच्या पोलिस कोठडीत दोन दिवस वाढ करण्याचा आदेश न्यायालयाने दिला आहे. 

डॉ. सतीश शाहूराव चव्हाण (वय 45, रा. शुक्रवार पेठ) असे पोलिस कोठडीत वाढ केलेल्याचे नाव आहे. या प्रकरणात उतारा करणारा मांत्रिक सचिन सदाशिव येरवडेकर (वय 48, रा. 306, कसबा पेठ) याला यापूर्वीच अटक करण्यात आली आहे. तो सध्या न्यायालयीन कोठडीत आहे. संध्या गणेश सोनवणे असे उपचारादरम्यान मृत्यू झालेल्या तरुणीचे नाव आहे. त्यांचा भाऊ महेश विष्णू जगताप (वय 22, रा. इंद्रायणीनगर, भोसरी) यांनी याबाबत फिर्याद दिली आहे. 

पोलिस कोठडीची मुदत संपल्याने पोलिसांनी डॉ. चव्हाण याला न्यायालयात हजर केले. त्या वेळी त्याने त्याच्या स्वारगेट येथील चव्हाण नर्सिंग होम येथे उपचार घेणाऱ्या रुग्णासोबत अंधश्रद्धेचे कृत्य केले आहे का, याचा तपास करण्यासाठी त्याच्या पोलिस कोठडीत वाढ करण्याची मागणी सरकारी वकिलांनी केली. त्यानुसार न्यायालयाने त्याच्या पोलिस कोठडीत वाढ केली. 

Web Title: Doctor's increase in police custody