डॅाक्टरांच्या संघटनेच्या कार्यकारिणीत शंभर टक्के महिला राज

प्रफुल्ल भंडारी
बुधवार, 2 मे 2018

दौंड (पुणे) : दौंड तालुक्यातील दौंड मेडीकल असोसिएशन या वैद्यकीय चिकित्सकांच्या संघटनेच्या कार्यकारिणीत पहिल्यांदाच पूर्णपणे महिलांचा समावेश करण्यात आला आहे. बालरोगतज्ज्ञ डॅा. सुनीता कटारिया यांची असोसिएशनच्या अध्यक्षपदी निवड करण्यात आली आहे. 

दौंड (पुणे) : दौंड तालुक्यातील दौंड मेडीकल असोसिएशन या वैद्यकीय चिकित्सकांच्या संघटनेच्या कार्यकारिणीत पहिल्यांदाच पूर्णपणे महिलांचा समावेश करण्यात आला आहे. बालरोगतज्ज्ञ डॅा. सुनीता कटारिया यांची असोसिएशनच्या अध्यक्षपदी निवड करण्यात आली आहे. 

दौंड शहरात पार पडलेल्या एका समारंभात डॅा. सुनीता कटारिया यांनी मावळते अध्यक्ष डॅा. राजेश दाते यांच्याकडून पदाची सूत्रे स्वीकारली. पदग्रहण समारंभास  माजी आमदार रंजना कुल, नगराध्यक्षा शीतल कटारिया,अजोळ संस्थेच्या प्रमुख मोनिका कुलकर्णी, असोसिएशनच्या गव्हर्नर तथा रोटरी क्लबच्या माजी अध्यक्षा डॅा. प्रतिभा भंगाळे व्यासपीठावर उपस्थित होत्या. नूतन अध्यक्षा डॅा. सुनीता संदीप कटारिया या तालुक्यातील सामाजिक क्षेत्रात सक्रिय असून त्यांनी असोसिएशनच्या विविध पदांची जबाबदारी सांभाळलेली आहे.

मोनिका कुलकर्णी यांनी या वेळी मुलांच्या शारीरिक व मानसिक वाढीसाठी योग्य संगोपन होणे आवश्यक असल्याचे प्रतिपादन करीत मुलांना आपल्या समृध्द संस्कृतीचे दर्शन घडविण्याचे आवाहन केले. रंजना कुल यांनी शंभर टक्के महिला कार्यकारिणीचे कौतुक करीत संघटनेच्या माध्यमातून अधिकाधिक गरीब व गरजूंची सेवा करण्याचे आवाहन केले. 

असोसिएशनची कार्यकारिणी पुढीलप्रमाणे :- गव्हर्नर - प्रतिभा भंगाळे, उपाध्यक्षा - सुषमा भोर, शलाका कारंडे, सचिव - सुरेखा भोसले, नीता गिदवानी, खजिनदार - सुनीता कोचेवाड, भारती गिदवानी, कार्यकारिणी सदस्या - क्षितिजा कुलकर्णी, नाव्या पवार, सारिका कुलकर्णी, संपदा खवटे, लतिका डफळ, वैशाली टकले, स्मिता कारंडे, रिना बोरा, भाग्यश्री कोल्हे, सुलभा गावडे, अर्चना वाघमोरे, मृणाल वैद्य. 

Web Title: doctors union filled with 100 percent ladies in daund