पुण्यात माणुसकीला काळीमा; लोंखडी रॉडने मारल्याने कुत्र्याचा मृत्यू

सकाळ वृत्तसेवा
शनिवार, 11 जानेवारी 2020

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, रूग्णवाल सिगल सोसायटीमध्ये एक भटके कुत्रे शिरले. यावेळी सोसायटीच्या सुरक्षा पर्यवेक्षक तुकाराम व त्याच्या एका साथीदाराने कुत्र्याला लोंखडी गजाने मारहाण करून जखमी केले. त्यानंतर त्याला सोसायटीमागील मोकळ्या जागेत फेकून दिले.

हडपसर : सोसायटीत मोकाट कुत्रे शिरल्याने सुरक्षा पर्यवेक्षकाने व त्याच्या साथीदाराने कुत्र्याला लोंखडी गजाने मारहाण केल्याने कुत्र्याचा मृत्यू झाला. हि घटना हांडेवाडी रस्त्यावरील श्रीराम चौकातील सीगल सोसायटीमध्ये घडली. याप्रकरणी वानवडी पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल झाला आहे. या प्रकरणी 'वीवा' या स्वयंसेवी संस्थेच्या विनाती असीन टंडन (वय ५०, रा, कोद्रे नगर, मांजरी फार्म, ता. हवेली, जी. पुणे ) यांनी तक्रार दाखल केली आहे.

पुणे जिल्हा परिषदेच्या अध्यक्ष, उपाध्यक्षांवर शिक्कामोर्तब; यांची निवड

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, रूग्णवाल सिगल सोसायटीमध्ये एक भटके कुत्रे शिरले. यावेळी सोसायटीच्या सुरक्षा पर्यवेक्षक तुकाराम व त्याच्या एका साथीदाराने कुत्र्याला लोंखडी गजाने मारहाण करून जखमी केले. त्यानंतर त्याला सोसायटीमागील मोकळ्या जागेत फेकून दिले. या घटनेत कुत्र्याच्या डोकयाला गंभीर दुखापत झाली. याबाबत फिर्यादी टंडन यांना नागरिकांनी फोन करून घडलेल्या घटनेची माहिती सांगितली. त्यानंतर टंडन यांनी कुत्र्याला सोपान बागेतील रेन ट्री सोसायटीत उपचारासाठी दाखल केले. मात्र, उपचार चालू असताना त्याचा मृत्यू झाला.

संभाजीराजेंचे उपोषण मागे; सारथीची स्वायत्तता कायम राहणार (व्हिडिओ)

'वीवा' संस्थेतर्फे भटके कुत्रे तसेच फिरस्ते जनावरे यांच्यावर होणाऱ्या अत्याचारापासून जनावरांना वाचविण्याचे काम करते. तसेच जर प्राण्यांवर अत्याचार करून त्याला निर्दयतेने कोणी मारून टाकले तर त्याबाबत पोलिसांच्या मदतीने कायदेशीर कारवाई करते.

 


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: A dog dies after beaten by a Iron rod in pune