कुत्र्याने घाण केल्यास मालकाला होणार दंड

एकीकडे शहर स्वच्छतेसाठी प्रयत्न सुरू असता दुसरीकडे रोज सकाळी, सायंकाळी पाळीव कुत्र्यांना बाहेर फिरायला आणून सार्वजनिक ठिकाणी पादचारी मार्ग, रस्त्यांवर विष्ठा करायला लावणारे नागरिक पुण्यात आहेत.
dog
dogsakal
Summary

एकीकडे शहर स्वच्छतेसाठी प्रयत्न सुरू असता दुसरीकडे रोज सकाळी, सायंकाळी पाळीव कुत्र्यांना बाहेर फिरायला आणून सार्वजनिक ठिकाणी पादचारी मार्ग, रस्त्यांवर विष्ठा करायला लावणारे नागरिक पुण्यात आहेत.

पुणे - एकीकडे शहर स्वच्छतेसाठी प्रयत्न सुरू असता दुसरीकडे रोज सकाळी, सायंकाळी पाळीव कुत्र्यांना बाहेर फिरायला आणून सार्वजनिक ठिकाणी पादचारी मार्ग, रस्त्यांवर विष्ठा करायला लावणारे नागरिक पुण्यात आहेत. त्यामुळे इतर नागरिकांना चालताना त्रास होत आहेच शिवाय घाणही होत आहे. त्यामुळे यास कारणीभूत असणाऱ्या पाळीव कुत्र्यांच्या मालकाला ५०० रुपयांचा दंड ठोठावण्यास महापालिकेने सुरवात केली आहे.  

नागरिकांना वेगवेगळ्या प्रजातींची देशी परदेशी कुत्रे पाळण्याची आवड असते. त्याचे खाणे पिणे, आरोग्य याची नागरिक भरपूर काळजी घेतात. शहरात सुमारे ८० हजार पाळीव कुत्रे आहेत, पण केवळ साडेपाच हजार कुत्र्यांचाच नागरिकांनी परवाना घेतला आहे. तसेच परवाना देताना कुत्रा सार्वजनिक ठिकाणी अस्वच्छता करणार नाही, याची काळजी घ्यावी अशी सूचना महापालिकेने दिलेली असते.

अनेक नागरिक सकाळी, संध्याकाळी पाळीव कुत्र्यांना बाहेर फिरण्यास आणतात. त्यावेळी ते रस्त्यावर, पादचारी मार्गावरच विष्ठा करतात. त्यामुळे अनेक पादचारी मार्ग, रस्ते खराब होत आहेत. त्याचा त्रास इतर नागरिकांना होत असल्याने त्यांनी आक्षेप घेतल्यास वाद निर्माण होत आहे. दरम्यान पाळीव कुत्र्यांना रस्त्यावरच घाण करायला लावणाऱ्या मालकांवर दंडात्मक कारवाई करण्याचे अधिकार महापालिकेला आहेत. पण हे अधिकार वापरले जात नसल्याने अशा नागरिकांना भय नाही.

घनकचरा विभागाची नुकतीच एक बैठक झाली, त्यामध्ये मोहल्ला कमिटीच्या सदस्यांनीही या प्रकाराबाबत तक्रारी केल्या. त्यामुळे सर्व १५ क्षेत्रीय कार्यालयाच्या अंतर्गत उघड्यावर पाळीव कुत्र्यांनी विष्ठा केल्यास त्याच्या मालकाकडून ५०० रुपयांचा दंड वसूल करण्याचे आदेश दिले आहेत.

आरोग्य निरीक्षकांवर जबाबदारी

शहरात घाण निर्माण करण्यास कारणीभूत असणाऱ्या नागरिकांवर लक्ष ठेवून कारवाई करावी असे सांगण्यात आले असून, त्याची जबाबदारी प्रत्येक क्षेत्रीय कार्यालयाच्या आरोग्य निरीक्षकावर देण्यात आली आहे. प्रत्येक कारवाईत ५०० रुपयांचा दंड करता येईल. तसेच वारंवार उल्लंघन करणाऱ्या नागरिकांवर यापेक्षाही कडक कारवाई केली जाऊ शकते. आज पहिली कारवाई कोथरूड क्षेत्रीय कार्यालयाच्या हद्दीत केली आहे.

- आशा राऊत, उपायुक्त, घनकचरा व्यवस्थापन विभाग

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com