कुत्र्यांच्या नियमावलीची घोषणा हवेतच

सकाळ वृत्तसेवा
रविवार, 24 जून 2018

पुणे - पाळीव आणि मोकाट कुत्र्यांचा लोकांना त्रास होऊ नये, याकरिता त्यांची संख्या, सुरक्षितता आणि पालन व्यवस्थेवर देखरेख ठेवण्यासाठी नियमावली करण्याची घोषणा महापालिकेच्या महिला व बालकल्याण समितीने केली. मात्र या घोषणेला तीन महिने उलटूनही प्रशासनाच्या उदासीनतेमुळे नियमावलीचे स्वरूप ठरलेले नाही. 

पिसाळलेल्या कुत्र्याने सहा जणांना चावा घेतल्याची घटना कात्रज परिसरात शुक्रवारी घडली. त्यात तीन वर्षांच्या मुलीचाही समावेश आहे. या घटनेमुळे मोकाट कुत्र्यांची समस्या पुन्हा ऐरणीवर आली. 

त्यावर उपाययोजना करीत असल्याचा दावा संबंधित अधिकाऱ्यांचा आहे. प्रत्यक्षात मात्र उपाययोजनांची परिणामकारकता जाणवत नसल्याचे कात्रजमधील घटनेने स्पष्ट केले आहे. 

हौसेमुळे पाळण्यात येणारे कुत्रे, मांजर असे प्राणी लोकांना त्रासदायक ठरत असल्याच्या तक्रारी आहेत. पाळीव प्राण्यांमुळे झालेले वाद पोलिस ठाण्यांपर्यंतही पोचले आहेत. दुसरीकडे, सर्वत्र मोकाट कुत्र्यांचे प्रमाण वाढले आहे. या पार्श्‍वभूमीवर विशेषत: एखाद्या घरात पाळीव प्राण्यांची संख्या नेमकी किती असावी, त्यापासून इतरांना त्रास होऊ नये म्हणून उपाययोजना करण्यासाठी नियमावली करण्यात येईल, अशी घोषणा महिला व बालकल्याण समितीच्या तत्कालीन अध्यक्ष राणी भोसले यांनी केली होती. धोरण तयार करून प्रस्ताव मांडण्याची सूचनाही त्यांनी आरोग्य खात्याला केली होती. नियमावलीच्या मुद्यावरून वादही झाला होता. त्यानंतर नियमावलीचे स्वरूप, गरज आणि परिणाम जाहीर सांगण्यात आल्याने विरोध मावळला. या नियमावलीमुळे पाळीव कुत्रे विशेषत: त्यांच्या संख्येवर मर्यादा येण्याची आशा आहे. परंतु या नियमावलीसंदर्भात ना लोकप्रतिनिधी ना अधिकारी गंभीर आहेत.

अशी आहे प्राथमिक नियमावली 
    सदनिकेच्या आकारानुसार प्राण्यांना परवानगी
    प्राण्यांची महापालिकेकडे नोंद बंधनकारक 
    घरात प्राण्यांसाठी राहण्याची व्यवस्था व आहार, आरोग्य यंत्रणा
    सोसायटीत प्राण्यांना हिंडण्यासाठी जागा
    वाहनांची वर्दळ असलेल्या भागात प्राण्यांसाठी सुरक्षितता
    प्राण्यांमुळे अनूचित घटना घडल्यास जबाबदारी निश्‍चित

पाळीव प्राण्यांबाबत धोरण निश्‍चित करण्याची सूचना महिला व बालकल्याण समितीने केली आहे. त्यावर कार्यवाही करण्यात येत आहे. सर्व घटकांचा विचार करून नियमावली तयार केली जाईल. वरिष्ठांशी चर्चा करून प्रस्ताव तयार करण्यात येईल.
- डॉ. वैशाली जाधव, सहायक आरोग्य प्रमुख, महापालिका

Web Title: dog rules issue