पुणे : कुत्र्याने वाचविले डॉक्टर मालकाचे प्राण (व्हिडिओ)

dog
dog

पुणे : कुत्र्याने संकटातून मालकाची सुटका केल्याची आतापर्यंत आपण अनेक उदाहरणे आपण पाहिली आहेत. पुण्यात तर चक्क कुत्रीच्या सतर्कतेमुळे हृदयविकाराचा झटका आलेल्या एका डॉक्टरचे प्राण वाचले आहेत.

कुत्रा हा प्रामाणिक प्राणी म्हणून ओळखला जातो, त्याचबरोबर माणसाचा सच्चा मित्रही आहे. पुण्यातील आदिनाथ सोसायटीमधील डॉ संचेती आणि प्राणीमित्र अमित शहा यांनी ब्राऊनी नावाच्या एका कुत्रीला मृत्यूच्या दाढेतून बाहेर काढले होते, त्यांनतर गेली 16 वर्षांपासून डॉ. संचेती आणि शहा हे ब्राऊनीचा सांभाळ करतात, २३ जानेवारीला बुधवारी रमेश संचेती यांना अंशत: पक्षघाताचा आणि मायनर हृदय विकाराचा झटका आला. त्यादिवशी दुपारी साडेबाराच्या सुमारास शहा  ब्राऊनीला जेवण भरवण्यासाठी आले होते. पण ब्राऊनी काही खात नव्हती. ती सतत संचेती यांच्या बेडरुमच्या खिडकीच्या दिशेने जात होती. काहीतरी चुकतय हे शाह यांच्या लक्षात आले. संचेती यांच्या बेडरुमच्या खिडकीला फट होती त्यातून आता पाहिले तर संचेती हे जमिनीवर कोसळलेले होते. शहा यांनी लगेचच खिडकीचे ग्रील काढून संचेती यांना रुग्णालयात दाखल केले. 

घटनेच्यावेळी रमेश संचेती एकटेच घरात होते. त्यांची पत्नी मुंबईला गेली होती. मुलगा पुण्याजवळच्या बावधन इथे असतो  तर मुलगी अमेरिकेत असते, मायनर हृदय विकाराचा झटका असला तरी डॉ. संचेती यांना तातडीने हॉस्पिटलमध्ये नेणे गरजेचे होते, जे केवळ ब्राऊनीमुळे शक्य झाले, 65 वर्षांच्या डॉक्टर रमेश संचेती यांच्यासाठी त्यांनी संभाळलेला कुत्राच देवदूत बनला.ब्राऊनीने डॉ रमेश संचेती यांचे शेजारी अमित शाह यांना सतर्क केले म्हणून रमेश संचेती यांचे प्राण वाचले.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com