भटक्या कुत्रयांना रेबीज इंजेक्शनसह गळ्यात हिरवा पट्टा

दिलीप कुऱ्हाडे
शुक्रवार, 14 डिसेंबर 2018

येरवडा : शहरातील भटक्या कुत्रयांना आता तीन वर्षांपर्यंत प्रतिकारशक्ती राहिल असे अँटीरेबीजचे इंजेक्शन देण्यात येणार आहे. यासह त्यांना सहज ओळखता यावे म्हणून त्यांच्या गळ्यात हिरवा पट्टा बांधण्यात येणार आहे. नवीन वर्षांपासून शहरातील लसीकरण आणि शस्त्रक्रिया केलेल्या कुत्रयांचे छायाचित्र काढून ते प्रमुख ठिकाणासह ऑनलाईन नोंदी ठेवण्यात येणार असल्याची माहिती डॉ. प्रकाश वाघ यांनी दिली.

येरवडा : शहरातील भटक्या कुत्रयांना आता तीन वर्षांपर्यंत प्रतिकारशक्ती राहिल असे अँटीरेबीजचे इंजेक्शन देण्यात येणार आहे. यासह त्यांना सहज ओळखता यावे म्हणून त्यांच्या गळ्यात हिरवा पट्टा बांधण्यात येणार आहे. नवीन वर्षांपासून शहरातील लसीकरण आणि शस्त्रक्रिया केलेल्या कुत्रयांचे छायाचित्र काढून ते प्रमुख ठिकाणासह ऑनलाईन नोंदी ठेवण्यात येणार असल्याची माहिती डॉ. प्रकाश वाघ यांनी दिली.

शहरात दरवर्षी कुत्रयांना अँटीरेबीजचे इंजेक्शन व त्यांची शस्त्रक्रिया केले जाते. गेल्या पाच वर्षांत सुमारे पन्नास हजार कुत्रयांची शस्त्रक्रिया व लसीकरण करण्यात आले. मात्र शहरातील दिवसेंदिवस वाढणाऱ्या भटक्या कुत्रयांची संख्या पाहता किती कुत्रयांना अॅंटीरेबीजचे इंजेक्शन दिले व किती कुत्रयांवर शस्त्रक्रिया केली हे शोधणे अवघड आहे. म्हणून आता शहरात एकच मध्यवर्ती भटक्या कुत्रयांना पकडून त्यांची शस्त्रक्रिया करणे त्यांना अँटीरेबीजचे इंजेक्शन देण्यासाठी संस्थेची नेमणूक केली आहे.
या संदर्भात डॉ. वाघ म्हणाले, संबंधित संस्था पुढील तीन वर्षे शहरातील भटक्या कुत्रयांचे लसीकरण व त्यांच्यावरील शस्त्रक्रिया करून त्यांच्या गळ्यात हिरव्या रंगाचा पट्टा बांधण्यात येणार आहे. पूर्वी कुत्रयांना देण्यात येणार अँटीरेबीजचे इंजेक्शनची प्रतिकारशक्ती एक वर्षापर्यंत राहत होती. आता नवीन इंजेक्शनची प्रतिकारशक्ती तीन वर्षांपर्यंत राहणार आहे. त्यानंतर कुत्रयांचे पुन्हा लसीकरण करण्यात येणार असून त्यांच्या गळ्यात नंतर लाल रंगाचा पट्टा बांधण्यात येणार आहे. त्यामुळे शहरातील भटक्या कुत्रयांची संख्या सहज मोजता येणार आहे. प्रति कुत्रयाची संपूर्ण माहिती संकलीत करण्यासाठी महापालिका संबंधित संस्थेला ८४० रूपये देणार आहे.

‘‘शहरातील कुत्रयांना पकडणे, त्यांना अँटीरेबीज इंजेक्शन देणे, त्यांच्या गळ्यात पट्टा बांधणे, त्याचे छायाचित्र काढून ते ऑनलाईन अपलोड करण्यात येणार आहे. त्यामुळे शहरातील भटक्या कुत्रयांवर करण्यात येणाऱ्या उपायोजनेत पारदर्शकता येणार आहे.’’
- डॉ. प्रकाश वाघ, प्रमुख, डॉग स्कॉड, आरोग्य विभाग

शहरातील फक्त १९१५ कुत्रयांची अधिकृत नोंद
शहरातील फक्त १९१५ कुत्रयांना अधिकृत परवाना आहे. त्या कुत्रयांना नियमित लसीकरण करण्यात येत. अशा कुत्रयांच्या गळ्यात नोंदणी क्रमाकांस गळ्यात पट्टा असल्याची माहिती आरोग्य विभागाने दिली.

Web Title: dogs have a green belt with rabies injection in the city