खोडद - मेंढ्यांच्या वाड्यात घुसून करडावर हल्ला करणाऱ्या बिबट्याला हुसकावून लावण्याचा प्रयत्न केला असता, बिबट्याने मुलगा आणि बापावर हल्ला केला. मात्र, याचवेळी वाड्यावर असलेल्या चार पाळीव कुत्र्यांनी बिबट्यावर झडप घातल्याने बाप व मुलगा बिबट्याच्या हल्ल्यातून वाचले. तर कुत्र्यांच्या हल्ल्यात बिबट्याचा मृत्यू झाल्याची घटना वडगाव कांदळी येथे शुक्रवारी (दि. २२) रात्री दीडच्या सुमारास घडली. कुत्र्यांनी केलेल्या हल्ल्यात बिबट्या ठार झाल्याची जुन्नर तालुक्यातील ही पहिलीच घटना आहे.