esakal | शहरात बकरी ईदची जय्यत तयारी
sakal

बोलून बातमी शोधा

eid

शहरात बकरी ईदची जय्यत तयारी

sakal_logo
By
कृष्णकांत कोबल

हडपसर : बकरी ईद (Bakri Eid) हा मुस्लिम समाजात साजरा केला जाणारा पवित्र सण. हा सण साजरा करण्यासासाठी मुस्लिम समाजातील प्रत्येक घरात तयारी सुरू आहे. त्यासाठी सय्यदनगर कोंढवा परिसरात छोट्या मोठ्या व्यावसायिकांची दुकाने सजली आहेत. कोरोनाच्या सावटामुळे बकरी ईद एकत्र येऊन साजरा करता येणार नसल्यामुळे पारंपरिक पध्दतीने तो घरोघरी साध्या पध्दतीने केला जाणार आहे. त्यासाठी घराघरातून खरेदी होताना दिसते. व्यावसायिकांनी त्यासाठी फळे, कपडे, शेवई, मेहंदी, बांगड्या, मिठाई याची रस्त्यावर हंगामी विक्रीची दुकाने थाटली आहेत. (domestic festival preparations bakri Eid city)

हेही वाचा: डिजीटल वारीतून साकारले पांडुरंगाचे निराकार रूप

कोरोनामुळे सलग दुसऱ्या वर्षी सुद्धा हा सण साध्या पध्दतीने साजरा होत आहे. त्यामुळे ग्राहकांकडून मागणीवर परिणाम झाला आहे. सणामध्ये चांगला व्यवसाय होत असतो. परंतु , गेल्यावर्षी प्रमाणे यंदाही त्यामध्ये मोठी घट झाली असल्याचे शेवई व कपडे विक्रेते रिहान शेख, शकील शेख यांनी सांगितले.

हेही वाचा: मुख्यमंत्र्यांनी पंढरपूरला येणे टाळावे - बंडातात्या कराडकर

माजी नगरसेवक फारूख इनामदार म्हणाले, "हा सण पवित्र व दानधर्माला महत्व देणारा आहे. तीन दिवस हा सण घराघरात श्रध्देने साजरा केला जातो. प्रत्येकाने गरिब नागरिकांना मदत करून , एकमेकांशी प्रेमभाव ठेवत संयमाने सण साजरा करावा.

loading image