

Gas Cylinder Blast in Dahitane: Miraculous Escape for Woman
Sakal
-संतोष काळे
राहू (पुणे) : स्वयंपाकासाठी लागणाऱ्या गॅसची टाकी अचानक लिकेज होऊन मोठा स्पोट झाल्याने संपूर्ण संसार उघड्यावर पडला आहे. नशीब बलवत्तर म्हणून महिला सुखरूप वाचली. ही घटना दहिटणे (ता.दौंड) येथे सोमवार (ता. २४) सकाळी साडेसात वाजण्याच्या सुमारास घडली. मंगल बबन चव्हाण ह्या सकाळी गॅसवर स्वयंपाक करण्यासाठी गेल्या असता अचानक गॅसचा स्फोट झाला. गॅसचा स्फोट इतका भयानक होता की काही क्षणात शेजारी राहणारे नागरिक त्या ठिकाणी आले. गॅसच्या स्फोटामुळे घराच्या छतावरील पत्रा लांब जाऊन पडला. तसेच भिंती देखील कोसळल्या असून काही भिंतींना भेगा पडल्या आहेत.