कुख्यात गुंड गंग्या दीड वर्षाकरिता तडीपार 

रवींद्र जगधने 
मंगळवार, 22 मे 2018

वाकड पोलिस ठाण्याच्या रेकॉर्डवरील गुन्हेगार रोहन ऊर्फ गंग्या वासुदेव वाघमारे (वय 23, रा. चौधरी पार्क पोलजवळ, वाकड) याला परिमंडळ तीनचे पोलिस उपायुक्त गणेश शिंदे यांनी पुणे शहर व पुणे जिल्ह्यातून दीड वर्षाकरिता हद्दपार करण्याचे आदेश दिले आहेत. 
 

पिंपरी (पुणे) : वाकड पोलिस ठाण्याच्या रेकॉर्डवरील गुन्हेगार रोहन ऊर्फ गंग्या वासुदेव वाघमारे (वय 23, रा. चौधरी पार्क पोलजवळ, वाकड) याला परिमंडळ तीनचे पोलिस उपायुक्त गणेश शिंदे यांनी पुणे शहर व पुणे जिल्ह्यातून दीड वर्षाकरिता हद्दपार करण्याचे आदेश दिले आहेत. 

गुंड गंग्या गेल्या दोन वर्षापासून वाकड पोलिस ठाण्याच्या हद्दीत गंभीर स्वरूपाचे गुन्हे करत होता. त्याची परिसरात दहशत निर्माण झाली असल्याने वरिष्ठ पोलिस निरीक्षक सतीष माने, निरीक्षक (गुन्हे) सुनील पिंजण यांच्या मार्गदर्शनाखाली पोलिस हवालदार सुहास पाटोळे, पोलिस शिपाई नाना झेंडे यांनी गंग्याच्या गुन्हेगारी कृत्यांची गोपनीय माहिती घेतली. त्यानुसार त्याच्या हद्दपारीचा प्रस्ताव पोलिस उपायुक्त कार्यालयाकडे पाठवण्यात आला होता.

Web Title: don gangya Bridle for one and half year