गृहनिर्माण सोसायट्यांना जीएसटी नको : सुळे

सकाळ वृत्तसेवा
रविवार, 22 एप्रिल 2018

गृहनिर्माण सोसायट्या पैसे मिळवण्यासाठी काम करीत नाही. त्या त्यांच्या संस्थेची देखभाल, दुरुस्ती व विकासाची कामे करतात. त्यामुळे सोसायट्यांना जीएसटी घेतला जात आहे. ते चुकीचे आहे. याबाबत अर्थमंत्रालयाला पत्रव्यवहार करणार आहे.

- सुप्रिया सुळे, खासदार

खडकवासला : गृहनिर्माण सोसायट्या पैसे मिळवण्यासाठी काम करीत नाही. त्या त्यांच्या संस्थेची देखभाल, दुरुस्ती व विकासाची कामे करतात. त्यामुळे सोसायट्यांना जीएसटी घेतला जात आहे. ते चुकीचे आहे. याबाबत अर्थमंत्रालयाला पत्रव्यवहार करणार आहे, असे राष्ट्रवादी काँग्रेसच्या खासदार सुप्रिया सुळे यांनी सांगितले. 

संपर्क अभियानांतर्गत वडगाव खुर्द येथील राजयोग सोसायटीत नागरिकांशी संवाद साधताना त्या बोलत होत्या. यावेळी, सोसायटीचे अध्यक्ष ल.म. देशमुख, प्रदीप झामरे, आर. के तोटे, नारायण इंगोले, तपाडिया, थोरात यांच्यासह अन्य सभासद उपस्थित होते.

यावेळी सुळे यांच्यासमवेत काका चव्हाण, सचिन दोडके, विकास दांगट, विशाल तांबे, अक्रूर कुदळे, बाजीराव रायकर, रुपाली चाकणकर, सुरेखा दमीष्टे, यावेळी उपस्थित होते.

Web Title: Dont Apply GST on Home Society says MP Supriya Sule