विचारधारेवरून मतभेद नकोत, चर्चेतून मार्ग काढा : कोश्यारी

सकाळ वृत्तसेवा
शुक्रवार, 31 जानेवारी 2020

चर्चेतून कोणत्याही समस्येवर मार्ग निघू शकेल. त्यामुळे समाजातील विविध विचारधारा असलेल्यांनी एकाच व्यासपीठावर येऊन, चर्चा करावी, असे आवाहन महाराष्ट्राचे राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांनी शुक्रवारी (ता.31) पुण्यात बोलताना केले.

पुणे : भारतात स्वतःला उदारमतवादी, नागरी समाज आणि पुरोगामी म्हणून घेणारे अनेक आहेत. या वेगवेगळ्या विचारधारांमुळे समाजात मतभेद दिसतात. परंतु हे मतभेद टाळण्यासाठी विविध विचारधारा असणाऱ्या सर्व गटांनी समोरासमोर येऊन चर्चा केली पाहिजे. चर्चेतून कोणत्याही समस्येवर मार्ग निघू शकेल. त्यामुळे समाजातील विविध विचारधारा असलेल्यांनी एकाच व्यासपीठावर येऊन, चर्चा करावी, असे आवाहन महाराष्ट्राचे राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांनी शुक्रवारी (ता.31) पुण्यात बोलताना केले.

ताज्या बातम्यांसाठी डाऊनलोड करा ई-सकाळचे ऍप

समाज युगानुयुगे टिकण्यासाठी आणि तो एक करण्यासाठी साहित्यिक, कलाकार योगदान देऊ शकतात. त्यांचे हे योगदान देश आणि जगासाठी उपयुक्त ठरू शकते. या विचारमंथनातून नवनीत पुढे येईल, असा विश्वासही त्यांनी यावेळी व्यक्त केला. दकनी अदब फाऊंडेशनच्यावतीने पुण्यात तीन दिवसीय 'डेक्कन लिटरेचर फेस्टिव्हल'चे आयोजन करण्यात आले आहे. या फेस्टिव्हलचे उद्‌घाटन कोश्यारी यांच्या हस्ते झाले. त्यावेळी ते बोलत होते. यावेळी खासदार डॉ. सत्यपाल सिंग, दिग्दर्शक विशाल भारद्वाज, साखर आयुक्त सौरभ राव, जिल्हाधिकारी नवल किशोर राम, उपजिल्हाधिकारी मोनिका सिंग, मनोज ठाकूर, रवींद्र तोमर आदी उपस्थित होते.

कोरोनाला घाबरू नका; अशा प्रकारे घ्या काळजी

कोश्यारी म्हणाले,"भारत रत्नांची खाण आहे. या महोत्सवाच्या आयोजनाबद्दल मोनिका सिंग आणि त्यांच्या सहकाऱ्यांचे अभिनंदन केले पाहिजे. पुणे ही सांस्कृतिक राजधानी आहे. त्यामुळे येथे होत असलेला हा महोत्सव महत्त्वपूर्ण आहे.खरं तर असा महोत्सव हा सरकारमार्फत व्हायला पाहिजे. सध्या कलेला नवे स्वरूप येत आहे. पण त्यातही कलेची पूर्वीची मुळे सुरक्षित राहिली पाहिजेत. साहित्यात समाजाचे प्रतिबिंब पडत असते. कलेत
मोठी ताकद असते. त्याचा उपयोग कसा होतो, हे पाहणे महत्त्वाचे आहे.''

कोरेगाव पार्कचे नाव राहणार कायम; 'हे' नाव करण्याचा होता प्रस्ताव

सध्या समाजात लिटरेचर फेस्टिव्हल होत आहेत, ही स्वागतार्ह गोष्ट आहे. साहित्य, संस्कृती, कला यांचा चांगला मिलाफ या फेस्टिव्हलमध्ये आहे. यानिमित्ताने या फेस्टिव्हलमध्ये जे मंथन होईल ते समाजाला पुढे घेऊन जाईल, अशी अपेक्षा दिग्दर्शक विशाल भारद्वाज यांनी यावेळी व्यक्त केली. मोनिका सिंग यांनी प्रास्ताविक केले. या समारंभात राज्यपालांच्या हस्ते मोनिका सिंग यांच्या गझलांच्या संग्रहाचे प्रकाशन झाले.राजीव श्रीवास्तव यांनी सूत्रसंचालन केले.

तर आम्ही उपाशी राहू; चहातील भेसळीवर येवलेंचा खुलासा

दरम्यान, उद्‌घाटनानंतर विशाल भारद्वाज यांच्या उपस्थितीत "व्यावसायिक चित्रपटातील कल्पकता' या विषयावर परिसंवाद झाला. आरती अंकलीकर यांच्या गायनाने कार्यक्रमाचा समारोप झाला.

साहित्याने जोडण्याचे काम करावे : डॉ. सिंग
वेद हे जगातले पहिले काव्य होते. काव्याचे महत्त्व अनन्यसाधारण आहे. नव्या पिढीसमोर चांगले साहित्य येत नाही. जीवन समृद्ध करण्यासाठी आणि समाजाचा सर्वांगीण विकास करण्यासाठी साहित्याची गरज आहे. त्यामुळे साहित्याने सर्वांना जोडण्याचे काम करावे, असे मत खासदार आणि पुण्याचे माजी पोलिस आयुक्त डॉ. सत्यपाल सिंग यांनी व्यक्त केले.


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Dont dissension due to ideology focus on discussion says Governor