

PMPML Update
Sakal
पुणे : पीएमपी प्रशासनाने शहरात डबलडेकर बसची यशस्वी चाचणी पूर्ण केल्यानंतर आता डबलडेकरच्या नियमित सेवेसाठी महत्त्वपूर्ण पावले उचलण्यास सुरुवात केली आहे. येत्या जानेवारीत २५ बस भाडेतत्त्वावर पीएमपीच्या ताफ्यात दाखल होणार असून पाच मार्गांवर या बस धावतील. याचे तिकीट दर मात्र ई-बस इतकेच असणार आहे. यापूर्वी १९९५ मध्ये पुण्यात डबलडेकर बस धावल्या होत्या. आता ३० वर्षानंतर पुण्यात पुन्हा एकदा डबलडेकर बस धावणार आहेत.