Pune : डाऊ आंदोलकांची निर्दोष मुक्तता; ग्रामस्थांसह वारकऱ्यांनी दिला होता लढा

कंपनी हद्दपार पण न्यायालयीन लढा होता सुरू
Dow company warkari protesters fought by villagers court battle ongoing
Dow company warkari protesters fought by villagers court battle ongoingSakal

आंबेठाण : शिंदेगाव ( ता.खेड ) येथील डाऊ कंपनी या बहुराष्ट्रीय कंपनीत जाळपोळ करीत आंदोलन करणाऱ्या हभप बंडातात्या कराडकर, मधुसूदन महाराज पाटील यांच्यासह ४४ आंदोलकांची आज (दि.२९) राजगुरूनगर येथील अतिरिक्त जिल्हा व सत्र न्यायालायने पुराव्या अभावी निर्दोष मुक्तता केली.

शिंदेगाव (ता.खेड) येथील ११० एकर गायरान जागा एमआयडीसीने २००७ साली बहुराष्ट्रीय डाऊ केमिकल कंपनीला दिली होती. मध्य प्रदेशातील भोपाळ वायू दुर्घटनेशी संबंधित असलेल्या कंपनीची डाऊ ही दुसरी शाखा आणि केमिकल कंपनी असल्याने शिंदे ग्रामस्थांनी कंपनीला विरोध करून आंदोलन सुरु केले.

कंपनीला शासनाने मदत करून पोलिस बळाचा वापर करीत कंपनी विरुद्धचे आंदोलन मोडीत काढण्याचे प्रयत्न केले. ग्रामस्थांच्या आंदोलनाला माजी न्यायमूर्ती बी.जी.कोळसे पाटील यांचे लोकशासन आंदोलन,हभप बंडातात्या कराडकर यांची वारकरी संघटना,सचिन शिंदे यांची महाराष्ट्र व्यसनमुक्ती संघटना आणि आळंदीतील वारकरी विद्यार्थी, कीर्तनकार मंडळी या सर्वांच्या माध्यमातून डाऊ कंपनी हद्दपारीसाठी दररोज आंदोलन सुरु होते.

गावात डाऊ केमिकल ही अतिविषारी कंपनी होऊ नये यासाठी आंदोलन करण्यात आले होते.सरकार आपले ऐकत नाही ही आंदोलकांची मानसिकता झाल्याने त्यांनी २५ जुलै २००८ रोजी सकाळी कंपनीत घुसून कंपनी पेटवून दिली आणि आंदोलक फरार झाले.

आंदोलना दरम्यान आंदोलकांनी तोडफोड,जाळपोळ केली होती.आंदोलनानंतर पोलिसांनी बंडातात्या कऱ्हाडकर,मधुसूदन महाराज पाटील,माऊली नामदेव टेमगिरे,पंडित दशरथ पानमंद,गोरक्ष भगवंत पानमंद, विठ्ठल बबन पानमंद,शांताराम विष्णू टेमगिरे,

शांताराम मारुती पानमंद,नेताजी गाडे,शांताराम बाबुराव पानमंद,सुनील दत्तात्रय देवकर,अंकुश बाबुराव घनवट,विनायक भिका पानमंद,सचिन देवकर,विनोद पाचपुते यांच्यासह १५० ते २०० स्थानिक आंदोलकांवर चाकण पोलीस ठाण्यात गुन्हे दाखल केले होते. न्यायालयलीन लढाई सुरू असताना गुन्हे दाखल असलेल्या ४४ प्रमुख आंदोलकांपैकी पाच मयत झाले आहेत.

या घटनेनंतर सरकारने तात्काळ कंपनी उभारणीला स्थगिती दिली आणि कंपनी हद्दपार झाली. परंतु राजगुरूनगर येथील अतिरिक्त जिल्हा व सत्र न्यायालयात सलग १५ वर्ष हा खटला सुरु होता. खटल्याच्या तारखेला येताना आंदोलकांची दमछाक होत होती. त्याचा निकाल आज न्यायाधीश एस.पी पोळ यांनी दिला.सबळ पुराव्या अभावी आंदोलकांची निर्दोष मुक्तता केली.आंदोलकांच्या वतीने ॲड. पोपटराव तांबे यांनी काम पहिले.

निकालानंतर तत्कालीन आंदोलक म्हणाले की सरकारने आमच्यावर गुन्हे दाखल केले.गुन्हे मागे घेण्याचे सरकारने आश्वासन दिले मात्र ते पाळले नाही. आम्ही १५ वर्षे न्यायालयीन लढाई लढलो. डाऊ केमिकल विरोधात वारकऱ्यांचा लढा जगाच्या इतिहासात नोंद करणारा असा आहे. या कंपनीला आम्ही शह दिला आणि तिला हद्दपार केले.

सुनिल देवकर

आमची त्यातून सबळ पुराव्या अभावी निर्दोष मुक्तता झाली. एकही रुपया न घेता ॲड. पोपटराव तांबे यांनी १५ वर्षे न्यायालयात बाजू मांडली. या पुढे गावात अशा केमिकल व नागरिकांच्या आरोग्याला हानिकारक ठरणाऱ्या कंपन्यांना येऊ देणार नाही अशी आमची भूमिका राहील.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com