Wagholi Crime: हुंडाबळी ठरलेल्या वैष्णवी हगवणे प्रकरणाची अद्यापही पुण्यात चर्चा सुरु असताना आणखी एक हुंडाबळीची घटना समोर आली आहे. यामध्ये देखील २३ वर्षीय नवविवाहितेनं सासरच्या मारहाणीला आणि छळाला कंटाळून इमारतीच्या दुसऱ्या मजल्यावरुन उडी घेत मृत्यूला कवटाळलं. याप्रकरणी पोलिसांनी सासू, पती, दीर आणि मुलाचे दोन मामा यांच्याविरोधात गुन्हा दाखल केला आहे. यांपैकी पतीला अटक करण्यता आली आहे. तर इतरांचा शोध पोलीस घेत आहेत.