पिंपरी-निगडी मेट्रो रेल्वेचा डीपीआर उद्या "स्थायी'समोर 

सकाळ वृत्तसेवा
सोमवार, 10 डिसेंबर 2018

पिंपरी - स्वारगेट ते पिंपरी मेट्रो मार्ग पिंपरीपासून निगडीपर्यंत वाढविण्यासाठी सविस्तर प्रकल्प आराखडा महाराष्ट्र मेट्रो रेल कॉर्पोरेशन लिमिटेड कंपनीने तयार केला आहे. तो मान्यतेसाठी मंगळवारी (ता. 11) होणाऱ्या महापालिका स्थायी समितीसमोर ठेवण्यात आला आहे. स्थायी समितीच्या मान्यतेनंतर संबंधित अहवाल सर्वसाधारण सभेत ठेवण्यात येणार आहे. त्यानंतर तो राज्य सरकारकडे सादर केला जाणार आहे व राज्य सरकार केंद्र सरकारकडे पाठविणार आहे. 

शहरातील सार्वजनिक वाहतूक व्यवस्था सक्षम करण्यासाठी पुणे-मुंबई महामार्गाने मेट्रो मार्ग उभारण्याचे काम सुरू आहे. दापोडीपासून पिंपरीपर्यंतच्या मार्गाचे काम प्रगतिपथावर आहे. हाच मेट्रो मार्ग पिंपरी महापालिका भवनापासून निगडीपर्यंत वाढविण्याचे प्रस्तावित आहे. त्यासाठी महाराष्ट्र मेट्रो रेल कॉर्पोरेशनने सविस्तर प्रकल्प आराखडा (डीपीआर) तयार करून महापालिकेला सादर केला आहे. त्यात पिंपरी ते निगडीदरम्यानची मेट्रो स्थानके, मार्गाची लांबी, संबंधित प्रकल्पाच्या कामाची पद्धती नमूद केली आहे. संबंधित मेट्रो मार्ग उभारणीसाठी भूसंपादन करणे व मार्गाला अडथळा ठरणाऱ्या सेवा वाहिन्यांचे स्थलांतर करणे आदी कामांचा समावेश आहे. या कामासाठी सुमारे एक हजार 48 कोटी 22 लाख रुपये खर्च अपेक्षित आहे. 

दृष्टिक्षेपात मेट्रो मार्ग 
पिंपरी महापालिका भवन ते निगडीपर्यंतचा मेट्रो मार्ग 4.413 किलोमीटर लांबीचा असेल. त्यावर तीन स्थानके प्रस्तावित असून, त्यात चिंचवड स्टेशन, आकुर्डी व निगडी यांचा समावेश आहे. 

Web Title: DPR of Pimpri-Nigdi Metro tomorrow in Standing committee