
पुणे : चार्वाक यांनी मानवी बुद्धीचे स्वातंत्र्य हाच खरा मोक्ष असे तर्कावर आधारीत भारतीय तत्वज्ञान मांडत माणसाला चिकीत्सा करण्याचा अधिकार असल्याचे सांगितले. त्या काळात त्यांना समाजाने नाकारले, त्यांची बदनामी केली, तरीही ते आपल्या निर्धारावर ठाम राहीले. व्हॉटस्अपवर आलेली माहितीची चिकीत्सा न करता ती पुढे पाठविण्याची वृत्ती आता नव्या पिढीमध्ये वाढत आहे. नव्या पिढीने वैज्ञानिक दृष्टीकोन ठेवुन चिकीत्सेला प्राधान्य दिले पाहीजे, तर पालकांनी देखील मुलांमध्ये वैज्ञानिक दृष्टीकोन रुजविण्यासाठी प्रयत्न केले पाहीजेत.' असे परखड मत ज्येष्ठ विचारवंत व साहित्यिक डॉ.आ.ह.साळुंखे यांनी शनिवारी व्यक्त केले.