dr amol kolhe over farmer protest maha vikas aghadi manchar politics
dr amol kolhe over farmer protest maha vikas aghadi manchar politicsSakal

Pune : केंद्र व राज्य सरकारच्या कानठळ्या बसतील असे आंदोलन शेतकरी करतील; डॉ.अमोल कोल्हे

मंचरला आक्रोश मोर्चाचे जोरदार स्वागत

मंचर :“कांदा निर्यात बंदी, बिबट प्रवण क्षेत्रात दिवसा वीजपुरवठा, दूध उत्पादक अनुदानाचा प्रश्न आदी शेतकऱ्यांच्या प्रश्नांची तड लावण्यासाठी महाविकास आघाडीचे कार्यकर्ते रस्त्यावर उतरून केंद्र व राज्य सरकारच्या कानठळ्या बसतील व त्यांना वठणीवर आणल्याशिवाय स्वस्थ बसणार नाही.” असा इशारा शिरूर लोकसभा मतदारसंघाचे खासदार डॉ.अमोल कोल्हे यांनी दिला.

मंचर (ता.आंबेगाव) येथे महाविकास आघाडीच्या वतीने शेतकरी आक्रोश मोर्चाचे आगमन शनिवारी (ता.२३) छत्रपती शिवाजी महाराज चौकात झाले. त्यावेळी डॉ.कोल्हे बोलत होते. यावेळी पुणे जिल्हा राष्ट्रवादी कॉंग्रेसचे अध्यक्ष जग्गनाथ शेवाळे,

कार्याध्यक्ष देवदत्त निकम, उद्धव बाळासाहेब ठाकरे शिवसेना पक्षाचे पुणे जिल्हा प्रमुख सुरेश भोर, आनंदराव चौगुले, माऊली खंडागळे, विकास लवांडे, कॉंग्रेसचे नेते अल्लू इनामदार, नित्यानंद येवले, दादाभाऊ थोरात,

सुरेखा अनिल निघोट, दिलीप पवळे, राजू कोल्हे, रमेश कोल्हे, दत्ता गांजाळे, सरपंच गोपाळा गवारी, सुरेश निघोट, धाेंडिभाऊ भाेर उपस्थित होते.सुरुवातीला छत्रपती शिवाजी महाराज यांच्या पुतळ्याला पुष्पहार अर्पण करण्यात आला. कांद्याच्या माळा घालून शेतकरी मोर्चात सहभागी झाले होते.

डॉ.कोल्हे म्हणाले “‘एक फुल दो डाउट फुल’ असे राज्य सरकार सत्तेवर आहे. नेत्यांना पक्ष फोडायला वेळ दिल्लीत मिळतो पण कांदा निर्यात बंदी उठवण्यासाठी त्यांना दिल्लीकरांकडून वेळ मिळत नाही ही शोकांतिका आहे.

ज्येष्ठ नेते शरद पवार यांच्या शेतकरी धोरणामुळे शेतकरी सुखावला होता, पण भारतीय जनता पक्षाच्या सरकारने शेतकऱ्यांची वाट लावली. विकासासाठी व प्रश्न सोडवण्यासाठी आम्ही महायुतीत व सरकारमध्ये सहभागी झालो. असा गाजावाजा करणाऱ्यांना आमचा प्रश्न आहे. शेतकऱ्यांचे प्रश्न सुटत नाही हे पाहून खुर्चीला लाथ मारून आपण स्वाभिमान दाखवणार का?”

सुरेश भोर यांनी भाजपवर टीका केली. ते म्हणाले “नोटेवर दिसणारा महात्मा गांधींचा फोटो गायब होऊन तिथे मोदींचा फोटो आला तर आश्चर्य वाटून घेऊ नका.”

निकम म्हणाले “दुधाला अनुदान दिले असं राज्य सरकार गाजावाजा करत असले तरी प्रत्यक्षात ८० टक्के दूध उत्पादक शेतकरी आजही दुधाच्या अनुदानापासून वंचित आहेत. युरियाच्या गोणीवरही भाजपच्या प्रचार केला जातो हा अजब प्रकार आहे.” यावेळी बाळासाहेब बाणखेले, राजाराम बाणखेले, अशोक काळे, यांची भाषणे झाली.

“आंबेगाव, खेड, जुन्नर व शिरूर तालुक्यात बिबट्याच्या हल्ल्यात आठ हजार जनावरे मृत्युमुखी पडली आहेत, आठ माणसांचा जीव गेला आहे. रात्री वीज द्या. अशी मागणी करून आम्ही थकलो. या प्रश्नासाठीही शेतकऱ्यांना बरोबर घेऊन आंदोलन उभे करावे लागेल.”

- डॉ.अमोल कोल्हे, खासदार

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com