सत्ताधाऱ्यांनी केवळ दिशाभूल केली : डॉ. अमोल कोल्हे 

सकाळ वृत्तसेवा
मंगळवार, 25 ऑक्टोबर 2016

पुणे : 'पुणेकरांनी गेली अनेक वर्षे सत्ता देऊनही त्यांची केवळ दिशाभूल करण्याचे काम महापालिकेतील सत्ताधाऱ्यांनी केले आहे. आगामी निवडणुकीत महापालिकेवर भगवा फडकणार असून, त्यासाठी एकजुटीने प्रयत्न करावा,'' असे आवाहन शिवसेनेचे संपर्कप्रमुख डॉ. अमोल कोल्हे यांनी मंगळवारी केले. 

महापालिकेतील सत्ताधारी राष्ट्रवादी कॉंग्रेस-कॉंग्रेसच्या कारभाराविरोधात शिवसेनेने महापालिकेवर 'परिवर्तन मोर्चा' काढला. त्यानंतर झालेल्या सभेत ते बोलत होते. 

डॉ. कोल्हे म्हणाले, ''नागरिकांच्या प्रश्‍नांना प्राधान्य दिले जात नाही. त्यामुळे गेल्या काही वर्षांत शहरातील समस्या गंभीर होत आहेत. त्याचा जाब सत्ताधाऱ्यांना विचारला पाहिजे.'' 

''सलग 25 वर्षे सत्ता असतानाही राष्ट्रवादी कॉंग्रेस आणि कॉंग्रेसला चांगल्या दर्जाच्या सुविधा पुरविता आलेल्या नाहीत. या दोन्ही पक्षांसह भाजपच्या चुकीच्या धोरणामुळे प्रलंबित प्रश्‍न मार्गी लागले नाहीत,'' असे शिवसेनेचे शहरप्रमुख विनायक निम्हण यांनी सांगितले. खासदार शिवाजीराव आढळराव-पाटील, माजी मंत्री शशिकांत सुतार यांचीही भाषणे या वेळी झाली. 

मंडई परिसरात वाहनांच्या रांगा 
महात्मा फुले मंडईतील लोकमान्य टिळक यांच्या पुतळ्यापासून शिवसेनेच्या मोर्चाला सुरवात झाली. दिवाळीमुळे मंडई आणि आजूबाजूच्या परिसरात सकाळपासून प्रचंड गर्दी होती. त्यातच मोर्चासाठी झालेली गर्दी आणि वाहनांमुळे वाहतूक कोंडी झाल्याने खरेदीसाठी आलेल्या नागरिकांचे हाल झाले. त्यामुळे मंडई, शनिपार, लक्ष्मी रस्ता, शनिवारवाडा परिसरातील वाहतूक कोलमडली. या भागातील रस्त्यांवर वाहनांच्या रांगा लागल्या होत्या.

Web Title: Dr. Amol Kolhe participates in Parvartan Morcha by Shiv Sena in Pune