Pune News : डॉ. गुजर यांच्या नावाने पुरस्कार ; ही पुरस्कारार्थींची पुण्याई ,डॉ. गुळवणी

'डॉ. दादा गुजर यांनी उभे केलेले काम नव्या कार्यकर्त्यांना प्रोत्साहन देणारे आहे. अनेक कुटुंबांना रोजगार उपलब्ध करून देण्याबरोबरच समाजाला दिशा देण्याचे काम त्यांनी केले. त्यांच्या नावाचा पुरस्कार मिळणे, ही पुरस्कारार्थींची मोठी पुण्याई आहे,
Pune News
Pune Newssakal

हडपसर : 'डॉ. दादा गुजर यांनी उभे केलेले काम नव्या कार्यकर्त्यांना प्रोत्साहन देणारे आहे. अनेक कुटुंबांना रोजगार उपलब्ध करून देण्याबरोबरच समाजाला दिशा देण्याचे काम त्यांनी केले. त्यांच्या नावाचा पुरस्कार मिळणे, ही पुरस्कारार्थींची मोठी पुण्याई आहे, असे मत जेष्ठ बालरोगतज्ञ डॉ. शिरीष गुळवणी यांनी व्यक्त केले.

सानेगुरुजी आरोग्य मंडळाचे संस्थापक दिवंगत डॉ. सि. तु. तथा दादा गुजर यांच्या १८ व्या स्मृतिसोहळ्या निमित्त त्यांच्या नावाने आरोग्य क्षेत्रातील कार्यासाठी जळगाव येथील डॉ. हेमकांत बावीस्कर, सामाजिक क्षेत्रातील कार्यासाठी बुधोडा जि. लातूर येथील ग्रामीण श्रमिक प्रतिष्ठानचे संस्थापक हरिश्चंद्र सुडे यांना पुरस्कार देऊन सन्मानित करण्यात आले. त्यावेळी प्रमूख पाहुणे म्हणून डॉ. शिरीष गुळवणी बोलत होते. ५१ हजार रुपये, मानपत्र, शाल व श्रीफळ असे पुरस्काराचे स्वरूप होते. संस्थेचे कार्यकारी समिती उपाध्यक्ष सतीश आगरवाल, सचिव अनिल गुजर, सदस्य डॉ. मिलींद जोशी, अनिता पाटील यावेळी उपस्थित होते.

पुरस्काराला उत्तर देताना डॉ. बावीस्कर म्हणाले , "डॉ. दादा गुजर यांच्या नावाने पुरस्कार मिळणे ही माझ्यासाठी खूप मोठी गोष्ट आहे. त्यांच्या त्यागी व सेवाभावी वृत्तीचा आदर्श आम्हाला कायम प्रेरणादायी राहील.' अंध दिव्यांग व्यक्तींना स्वावलंबी बनवण्यासाठी गेली अनेक वर्षे सातत्याने योगदान दिले आहे. या कामामागची प्रेरणा व पाठबळ डॉ. दादा गुजर व यदुनाथ थत्ते यांच्यासारख्या समाजपुरुषांकडून मिळाली असल्याचे हरिश्चंद्र सुडे यांनी सांगितले.

कार्यक्रमाचे व संस्थेचे अध्यक्ष डॉ. एस. एफ. पाटील म्हणाले, "दादांच्या प्रेरणा आजही कायम आहेत. डॉ. दादा महात्मा गांधीच्या वाटेवरुन चालणारे निरपेक्ष गांधीवादी होते. त्यांचा वारसा दादांची दोन्ही मुले अनिल व अरुण पुढे घेऊन जात आहेत.' संस्थेचे सहसचिव अरुण गुजर यांनी कार्यक्रमाचे प्रास्ताविक व उपस्थितांचे स्वागत केले. ठोबरे व सौ. वसाने यांनी सूत्रसंचालन केले. तर ज्योती चौधरी यांनी आभार मानले.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com