पालकांनी आणि शाळांमध्ये शिक्षकांनी कशी घ्यायची काळजी? सांगतायत विभागीय आयुक्त डॉ. म्हैसेकर

dr deepak mhaisekar writes about Precautions when starting school and colleges
dr deepak mhaisekar writes about Precautions when starting school and colleges

लोकप्रतिनिधी, पोलिस यांचा सामान्य जनतेशी व अनेकदा व्यक्तींच्या समूहाशी संपर्क येत असतो. कोरोना रुग्णांपैकी सत्तर टक्‍क्‍यांपेक्षा जास्त रुग्णात कोणतीही लक्षणे दर्शविणारी नसल्यामुळे गर्दीच्या ठिकाणी अशा व्यक्तींकडून संक्रमण होण्याची शक्‍यता नाकारता येत नाही. त्याचप्रमाणे पुढील काही महिन्यांत शाळा व महाविद्यालये सुरू करण्याचे नियोजनही करणे आवश्‍यक आहे. लहान मुले व त्याचबरोबर शिक्षकांसाठीही हा कसोटीचा काळ असणार आहे. यासंदर्भात कोणती काळजी घ्यावी, याबद्दल... 

  • गर्दी टाळता येत नसली तरी त्यांना भौतिक अंतर राखून संवाद करण्याच्या स्पष्ट सूचना द्याव्यात.
  • बोलणारी व्यक्ती स्वतःपासून किमान ५ ते ६ फूट अंतर राखेल याची काळजी घ्यावी.
  • बोलणाऱ्या व्यक्तीने मास्क मुळीच काढू नये. (बहुतांश लोकांना ही सवय असते.)
  • स्वतः ‘एन-९५’ मास्क वापरावा व समोरच्या गर्दीत एखाद्या व्यक्तीने मास्क घातला नसल्यास त्याच्याशी संवाद न करता त्यास जाण्याच्या सूचना द्याव्यात.
  •  व्यक्तीने कोणत्याही निवेदनाचा कागद दिल्यास त्याला स्पर्श टाळावा (हातमोजे वापरून) किंवा सर्व व्यक्तींशी भेटणे झाल्यानंतर हात व चेहरा साबणाने स्वच्छ धुवावा.
  •  दुसऱ्या व्यक्तीच्या मोबाईलवर बोलणे टाळावे. बोलायचेच असल्यास स्पिकर सुरू करून बोलावे. चेहऱ्यास मोबाईलचा संपर्क टाळावा.
  •  शक्‍यतो अन्य व्यक्तींचा पेन हाताळू किंवा घेऊ नये.
  •  अत्यंत गर्दीच्या ठिकाणी, प्रतिबंधित क्षेत्रात जायची शक्‍यता असल्यास फेसशिल्ड वापरावे.
  •  कोणत्याही परिचित किंवा अपरिचित व्यक्तींशी हस्तांदोलन करू नये.
  •  वाहनात बसल्यानंतर अनेक व्यक्तींना खिडकीजवळ येऊन बोलण्याची सवय असते. त्यामुळे भौतिक अंतर ठेवणे शक्‍य होत नाही. अशा व्यक्तींना वाहनापासून दूर राहूनच बोलण्याच्या सूचना द्याव्यात.
  •  फेसशिल्ड किंवा झिरो नंबरचा चष्मा वापरावा.
  •  वाहनामध्ये स्वतः बसलेल्या सीटवर शक्‍यतो कोणाही व्यक्तीला घेऊ नये.
  •  लोकप्रतिनिधी, अधिकारी यांच्या अंगरक्षक, वाहनचालकाने नियमित मास्क वापरावा.
  •  प्रतिबंधित क्षेत्र किंवा गर्दीच्या ठिकाणी जाऊन आल्यानंतर किंवा जाण्यापूर्वी वाहनाचे एक टक्का सोडिअम हायपोक्‍लोराइटने निर्जंतुकीकरण करावे.
  •  घड्याळ, गळ्यात चेन, अंगठी व धातूच्या अन्य वस्तू वापरू नयेत. 
  •  घरी गेल्यानंतर घरात अन्य कोणालाही, कोणत्याही वस्तूला स्पर्श करण्यापूर्वी साबणाने स्वच्छ हात धुवावेत व स्नान करावे. स्नान करताना डोकेही साबणाचा फेस करून स्वच्छ धुवावे. बाहेरून आणलेल्या व्यक्तिगत वापराच्या वस्तू, जसे की पेन, चष्मा डायरी इत्यादींचे निर्जंतुकीकरण करूनच घरात घ्याव्यात. 
  •  बाहेर वापरावयाची पादत्राणे घरात आणू नयेत. प्रामुख्याने घरात लहान मुले असल्यास अत्यंत दक्षता घ्यावी. 

शाळा व महाविद्यालये सुरू झाल्यावर घ्यावयाची काळजी

  •  शाळा किंवा महाविद्यालये सुरू होत असताना त्यातील सर्वच घटकांनी अत्यंत दक्ष राहणे आवश्‍यक आहे. 
  •  वाहनातून येताना घ्यावयाच्या खबरदारीबद्दल विद्यार्थ्यांना व त्यांच्या पालकांना सजग करावे. भौतिक अंतर ठेवणे, धातूंच्या वस्तूंना स्पर्श टाळणे, वाहनांचे व सीटचे नियमित निर्जंतुकीकरण करणे व मास्क वापरणे इ. पूर्वीच्या लेखामध्ये दिलेले आहे. 
  •  शाळा/महाविद्यालयाच्या प्रवेशद्वारावरच विद्यार्थ्यांचे तापमान घेऊन काही लक्षणे दिसत असल्यास शाळेत न येण्याचा सल्ला देणे, त्यांना प्रवेश नाकारणे व त्याबाबतीत त्यांच्या पालकांना माहिती द्यावी.
  •  शाळा भरताना व सुटताना गर्दी होणार नाही याची दक्षता घेणे. 
  •  विद्यार्थ्यांना कोरोनाचे संक्रमण कशा पद्धतीने होते व कोणत्या दक्षता घेणे आवश्‍यक आहे, हे समजावून सांगणे.
  •  शाळेत बेंचवर बसताना भौतिक अंतर राखणे, मास्क लावणे, इतरांच्या वस्तू- पेन्सिल, पेन, रबर, कंपास, फूटपट्टी इत्यादी न घेणे. 
  •  इतरांच्या वॉटर बॉटल्स न वापरणे, विशेषतः उष्टावलेल्या पाण्याच्या बाटल्या किंवा कोणतेही खाद्यपदार्थ न घेण्याबाबतीत विद्यार्थ्यांना स्पष्ट ताकीद देणे.
  •  इतरांचा रुमाल न वापरणे.
  •  जेवणापूर्वी व वेळोवेळी हात स्वच्छ साबणाने किमान ४० सेकंद धुणे.
  •  जेवताना सर्व विद्यार्थी एका ठिकाणी बसणार नाहीत याची दक्षता घेणे. आवश्‍यकता असल्यास वेगवेगळ्या वेळेस वेगवेगळ्या वर्गांना जेवणाची सुटी देऊन जेवणाच्या ठिकाणी गर्दी होणार नाही याची काळजी घ्यावी. 
  •  स्वच्छतागृहे वारंवार निर्जंतुकीकरण करणे व स्वच्छतागृहांत साबण, पाण्याची व्यवस्था करणे. 
  •  शाळेच्या/महाविद्यालयाच्या परिसरात किंवा बाहेरचे खाद्य व पेय पदार्थ घेण्यापासून परावृत्त करणे. 
  •  शाळेतून किंवा महाविद्यालयातून विद्यार्थी घरी आल्यानंतर त्यांनी आणलेल्या वस्तू, जसे की दप्तर, वॉटरबॉल इ. निर्जंतुक करून त्यांनाही हात व पूर्ण चेहरा साबणाने स्वच्छ धुणे बंधनकारक करणे. 
  •  लहान विद्यार्थ्यांना मास्क कसा वापरावा याबाबत सविस्तर प्रशिक्षण व मार्गदर्शन करणे अत्यंत आवश्‍यक आहे. या बाबतीत ही लेखमाला सुरू करतानाच्या पहिल्या भागातच सविस्तर मार्गदर्शन सूचना देण्यात आल्यात आहेत.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com