करायचे ते करून दाखवू - डॉ. के. व्यंकटेश

सकाळ वृत्तसेवा
मंगळवार, 7 ऑगस्ट 2018

पुणे - पुणेकरांना भेडसावणाऱ्या समस्या अगोदर सर्वांकडून ऐकून घेऊ, त्यानंतर जे काही करायचे ते करून दाखवू, असे सूचक वक्तव्य नवनियुक्त पोलिस आयुक्त डॉ. के. व्यंकटेश यांनी केले. नागरिकांनी आपल्या वैयक्तिक समस्या वगळता अन्य गंभीर समस्या ८९७५२८३१०० या व्हॉट्‌सॲप क्रमांकावर पाठवाव्यात, त्यांची गांभीर्याने दखल घेतली जाईल, असे त्यांनी स्पष्ट केले.

डॉ. के. व्यंकटेश यांनी पोलिस आयुक्तपदाची सूत्रे हाती घेतल्यानंतर सोमवारी पत्रकारांशी संवाद साधला. या वेळी त्यांनी शहरातील पोलिस व्यवस्था, त्यांचे काम, गुन्हेगारी, सध्याचे प्रश्‍न याविषयीची माहिती पत्रकारांकडूनच जाणून घेतली. त्यानुसार ३९ हून अधिक प्रश्‍नांची नोंद करून ‘आपली बदली होण्यापूर्वी ३९ प्रश्‍न सुटलेले असतील’ अशी ग्वाही त्यांनी दिली.

पुण्यासाठी नागपूर पॅटर्न नव्हे, तर तेथील अनुभवाचा जरूर वापर करू. गुन्हेगारीवर नियंत्रण व नागरिकांना चांगली सेवा देण्यास प्राधान्य देऊ, गुन्हेगारांच्या मनात १०० टक्के भीती असेल, तर पोलिस लोकांसाठी उपलब्ध असतील, असेही व्यंकटेश यांनी स्पष्ट केले.

पोलिस आयुक्त म्हणाले...
    गुन्हेगारी नियंत्रणात आणण्यास प्राधान्य 
    समाजविघातक कृत्य खपवून घेतले जाणार नाही
    वाहतूक कोंडी, सायबर गुन्ह्यांचा अभ्यास केला जाईल
    घरफोडी, सोनसाखळी चोऱ्यांच्या प्रश्‍नावर काम सुरू 
    दुचाकी चोरी टाळण्यासाठी हजार रुपयांचे ‘लॉक सिस्टिम’ वापरा

हेल्मेट वापरले पाहिजे 
दुचाकीवरून जाणाऱ्या तरुणांचा अपघातात मृत्यू झाल्याची घटना नुकतीच शहरात घडली. संबंधित घटनेत तरुणांनी हेल्मेट घातलेले नव्हते. हेल्मेट घातले असते, तर कदाचित त्यांचा जीव वाचला असता. त्यामुळे नागरिकांनी हेल्मेट घालण्यास प्राधान्य दिले पाहिजे, असे व्यंकटेश यांनी सांगितले.  

Web Title: Dr. K. Venkatesh Talking