वाहतूक कोंडी फोडण्यासाठी त्रिसूत्री - डॉ. व्यंकटेशम 

सकाळ वृत्तसेवा
शनिवार, 25 ऑगस्ट 2018

पुणे - अद्ययावत तंत्रज्ञान, अंमलबजावणी व लोकशिक्षण या त्रिसूत्रीच्या आधारे शहरातील वाढती वाहतूक कोंडी व अपघातांचे प्रमाण कमी करण्यावर पोलिस प्रशासनाचा भर असेल. वाहनचालकांना दंड आकारणे, कारवाई करणे हा पोलिसांचा उद्देश नाही. मात्र, नागरिकांनीही वाहतुकीबाबत स्वयंशिस्त पाळली पाहिजे, असे मत पोलिस आयुक्त डॉ. के. व्यंकटेशम यांनी शुक्रवारी व्यक्त केले. 

पुणे श्रमिक पत्रकार संघातर्फे डॉ. व्यंकटेश यांच्याशी वार्तालाप आयोजित केला होता. या वेळी गुन्हे शाखेचे पोलिस उपायुक्त शिरीष सरदेशपांडे, पत्रकार संघाचे अध्यक्ष राजेंद्र पाटील व इतर, पदाधिकारी उपस्थित होते. 

डॉ. व्यंकटेशम म्हणाले, ""नागरिकांना तक्रार नोंदविण्यासाठी पोलिसांनी व्हॉट्‌सऍप क्रमांक दिला असून, त्यावर दररोज 30 ते 40 तक्रारी येतात. सर्वाधिक तक्रारी वाहतुकीच्या असतात. वाहतूक कोंडीमुळे रुग्ण वेळेत रुग्णालयात पोचत नसल्याने मृत्यूही वाढत आहेत. त्यामुळेच वाहतूक सुरळीत करण्यासाठी प्रयत्न सुरू आहेत. वाहतुकीच्या नियमांचे उल्लंघन करणाऱ्यांवर कारवाई करण्याबरोबरच पीएमपीएलच्या बस बंद पडण्याचे प्रकार थांबविण्यासाठी प्रयत्न सुरू आहेत. त्यासाठी महापालिका, पीएमपीएल प्रशासनाचे सहकार्य घेतले जाईल.'' 

डॉ. व्यंकटेशम म्हणाले... 
- "कोअर पोलिसिंग'वर भर देणार 
- नागरिकांशी सतत संवाद ठेवला जाईल 
- पोलिसांच्या "स्किल डेव्हलपमेंट'साठीही प्रयत्न 
- समस्या निराकरणासाठी आयटी कंपन्या, शिक्षण संस्था, स्वयंसेवी संस्थांचे सहकार्य घेणार 
- तडीपार गुंडांवर कारवाईसाठी विशेष प्रयत्न करणार 
- सायबर पोलिस ठाण्याचे काम लवकरच सुरू होणार 
- भाडेकरूंची ऑनलाइन नोंदणी केल्यास पोलिसांना पुन्हा अर्ज देण्याची गरज नाही 
- ज्येष्ठांच्या सोईसाठी भाडेकरू नोंदणी "ऑफलाइन'बाबत विचार करू 
- पोलिसांच्या आरोग्य व घरांसाठी प्रयत्न करणार 
- "लॉस्ट अँड फाउंड'साठी दिल्लीच्या धर्तीवर तंत्रज्ञान वापरू 

पोलिसांवर हात उचलणाऱ्यांवर कडक कारवाई 
पोलिसांशी उद्धट वर्तन करण्यापासून त्यांना मारहाण करण्याचे प्रकार वाढत आहेत. अशा लोकांवर कायदेशीरदृष्ट्या अधिक शिक्षा व्हावी, यासाठी न्यायालयांना विनंती केली जाईल. त्यामुळे हे प्रकार थांबतील. 

शहरी नक्षलवाद, कट्टरतावादी संघटनांकडून लोकशाहीविरोधी कारवाया केल्या जातात. कोणत्याही शहरात अशा कारवाया होऊ नयेत. लोकशाहीविरोधी कारवाई होत असेल, तर आम्ही त्यांची गांभीर्याने दखल घेऊ. 
- डॉ. के. व्यंकटेशम, पोलिस आयुक्त 

Web Title: Dr K Venkatesham press conference